ठाणे : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ठाणे विभागाच्या चार वेगवेगळया पथकांनी नवी मुंबईतील महापे तसेच कोपरखैरणे येथे छापा टाकून बनावट विदेशी मद्याचा साठा शुक्रवारी जप्त केला आहे. या कारवाईत बनावट विदेशी मद्यासह १३ लाख ७६ हजारांचा मुद्देमाल जप्त केला असून यामध्ये तिघांना अटक केल्याची माहिती सूत्रंनी दिली.
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ई विभागाला मिळालेल्या माहितीच्या आधारे ठाण्याचे अधीक्षक निलेश सांगडे आणि उपअधीक्षक चारुदत्त हांडे यांच्या मार्गदर्शनाखाली २२ ऑक्टोबर रोजी ई विभागाचे निरीक्षक एस. एस. गोगावले, डी विभागाचे निरीक्षक राजेंद्र शिरसाठ, एफ -निरीक्षक पी. आर. तापडे आदींच्या पथकाने ही कारवाई केली. या पथकांनी महापे, शीळ फाटा येथील बनावट विदेशी मद्याच्या वाहतूकीवर पाळत ठेवून शिबीन तिय्यार (२७, रा. कोपरखैरणे) याच्या ताब्यातून एका मोटारीसह बनावट विदेशी मद्याचा साठा सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास जप्त केला. त्यानंतर त्याच्याच चौकशीतून कोपरखैरणो येथील सेक्टर २२ येथून आणखी काही बनावट विदेशी मद्याचा साठा जप्त केला. सखोल चौकशीमध्ये कोपरखैरणो येथील एका रो हाऊसमध्ये बनावट विदेशी मद्य बनविणा:या सुशिल तिय्यार (३३, रा. कोपरखैरणे ) आणि रमेश तिय्यार (३३, कोपरखैरणे ) या दोघांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून १०४ सिलंबद बाटल्या तसेच रिकाम्या ७०८ आणि १३६१ कॅप्स त्याचबरोबर बनावट स्कॉच तयार करण्याचे साहित्य तीन मोबाईल असा सुमारे १३ लाख ७६ हजार २८ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.