मुंबई : मित्राच्या पत्नीकडे एक लाख रुपयांची मागणी करीत ते न दिल्यास अश्लील फोटो ‘व्हायरल’ करण्याची धमकी देणाºया एका तरुणाला समतानगर पोलिसांनी उत्तर प्रदेशातून अटक केली. विजय सोनी (३०) असे त्याचे नाव असून, मित्राच्या पत्नीशी ओळख वाढवून त्याने तिच्याकडीलफोटो घेतले होते, असे पोलिसांनी सांगितले.सोनीच्या कार्यालयात काम करीत असलेल्या एका तरुणाने त्याला कांदिवलीतील ठाकूर व्हिलेज येथील आपल्या घरी पूजेसाठी बोलाविले होते. त्या वेळी त्याने त्याच्या पत्नीशी ओळख करून घेतली. त्यानंतर त्यांच्यात नेहमी मोबाइलवर बोलणे होऊ लागले. महिलेने त्याला आपले फोटो पाठविले होते. काही दिवसांपूर्वी सोनीने तिच्याकडे एक लाख रुपयांची मागणी केली होती. तिने त्याला नकार दिल्यानंतर त्याने तिचे ते फोटो अश्लीलपणे ‘एडीट’ करून तिला परत पाठवले. पैसे न दिल्यास ते फोटो ‘व्हायरल’ करण्याची धमकी पीडितेला दिली. त्यानंतर तिने हा प्रकार पतीला सांगितला. त्यांनी समतानगर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. सोनीला याबाबत समजल्यानंतर तो उत्तर प्रदेशात पळून गेला होता. पोलिसांनी त्याला आझमगडमधून अटक केली.
मित्राकडून पत्नीचे फोटो व्हायरल करण्याची धमकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2017 1:50 AM