तीन वर्षांपासून फरार असलेल्या मोस्ट वाँटेड छोटा राजनला अटक ही वर्ष २०१५ मधील गुन्हेगारी जगतातील सर्वात महत्त्वाची घटना ठरली. त्याशिवाय शीना बोरा हत्याकांड, चित्रकार हेमा उपाध्याय आणि हरीश भंबानी हे दुहेरी हत्याकांड मुंबईत प्रचंड गाजले. केंद्रीय न्यायवैद्यक प्रयोगशाळेने ड्रग्ज माफिया बेबी पाटणकरकडून जप्त केलेले एमडी नसल्याचे सांगितले आणि या प्रकरणाला वेगळेच वळण लागले. तर मॉरल पोलिसिंगच्या नावाखाली केलेली कारवाई पोलिसांसाठी तापदायक ठरली.११ महिन्यांत हत्या, हत्येचा प्रयत्न, दरोडा, चोरी, लूटमार, सोनसाखळी चोरी, घरफोडी, बलात्कार अशा ३८ हजारांहून अधिक गुन्ह्यांची नोंद एकट्या मुंबईत झाली. १५० जणांच्या निर्घृण हत्या करण्यात आल्या. अल्पवयीन मुलांच्या लैंगिक अत्याचारांमध्येही तिप्पट वाढ झाली. अल्पवयीन मुलींच्या लैंगिक अत्याचाराचे ४०४, तर अपहरणाचे ८४१ गुन्हे नोंदवण्यात आले. ड्रग्ज माफिया बेबी पाटणकर अटकेत९ मार्च - मरिन ड्राइव्ह पोलीस ठाण्याचे शिपाई धर्मराज काळोखेच्या सातारा कान्हेरीतील घरावर छापा घालून सातारा पोलिसांनी ११२ किलो एमडी तर मुंबई पोलिसांनी मरिन ड्राइव्ह पोलीस ठाण्यातील काळोखेच्या लॉकरमधून १२ किलो एमडीसह परदेशी चलन जप्त केले होते. याच प्रकरणी पोलिसांनी काळोखेची साथीदार ड्रग्ज माफिया शंकुतला उर्फ बेबी पाटणकरला अटक केली. आझाद मैदान पोलीस ठाण्याचे सुहास गोखले यांना अटक केली होती. जप्त पदार्थ एमडी नसून अजिनोमोटो असल्याचे केंद्रीय न्यायवैद्यक प्रयोगशाळेने स्पष्ट केल्यामुळे हे पोलिसांच्या अंगलट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.राजनला बेड्या : २५ आॅक्टोबर - मुंबई पोलिसांनी बजावलेल्या रेडकॉर्नर नोटिसींच्या आधारे मोस्ट वॉण्टेड गँगस्टर छोटा राजनला २५ आॅक्टोबर रोजी इंडोनेशिया येथील बालीमधून अटक करण्यात आली. ६ नोव्हेंबर रोजी भारतात आणण्यात आलेल्या राजनचा ताबा ७८ गुन्ह्यांप्रकरणी सीबीआयकडे सोपविण्यात आल्याने पोलिसांच्या पदरी निराशा पडली.गडकर हिट अॅण्ड रन ८ जून - दारूच्या नशेत पूर्व मुक्त मार्गावर भरधाव वेगाने आॅडी गाडी चालविणाऱ्या अॅड. जान्हवी गडकरने दोघांना चिरडले. या प्रकरणाने खळबळ उडाली होती.मॉरल पोलिसिंगवर ताशेरे६ आॅगस्ट - रोजी मड आणि अक्सा परिसरातील हॉटेलवर छापे टाकून ६० जणांना ताब्यात घेण्यात आले. या मॉरल पोलिसिंगविरोधात तीव्र प्रतिसाद उमटले. तर उच्च न्यायालयातही ताशेरे ओढण्यात आले. या प्रकरणानंतर उत्तर मुंबईचे अतिरिक्त पोलीस आयुक्त फतेसिंह पाटील यांची नांदेडला बदली करण्यात येणार होती. मात्र नंतर या आदेशाला स्थगिती देण्यात आली. लालबाग मारहाण प्रकरण२८ सप्टेंबर- लालबागचा राजाच्या दर्शनासाठी व्हीआयपींच्या रांगेतून घुसल्याचा रागात मीरा रोड येथील नंदिनीला पोलिसांकडून झालेल्या मारहाणीने पोलिसांवर ताशेरे ओढण्यात आले. व्हिडीओ व्हायरल होताच मुख्यमंत्र्यांनी दखल घेऊन कारवाईचे आदेश दिले. आयुक्तांच्या आदेशाने मारहाण करणाऱ्या पोलीस वर्षा पाटील, अनुराधा सोलंकी यांना निलंबित करण्यात आले.मालवणीतील तीन तरुण ‘इसिस’मध्ये?२१ डिसेंबर- मालवणीतील तीन तरुण इसिसमध्ये सामील झाल्याचा संशय आहे. पालकांनी हे तरुण बेपत्ता असल्याची तक्रार मालवणी पोलिसांकडे दाखल केली. राज्य दहशतवादविरोधी पथकाकडून (एटीएस) या तरुणांचा शोध सुरू आहे. अयाज सुलतान (२३), मोहसीन इब्राहिम (२६) आणि वाजीद शेख (२५) अशी त्यांची नावे आहेत.शीना मर्डर मिस्ट्रीआॅगस्ट- २४ एप्रिल २०१२च्या शीना बोरा हत्येप्रकरणी इंद्राणी मुखर्जीच्या अटकेने कॉर्पोरेट जगतासह सगळ्यांनाच हादरवले. याप्रकरणी पूर्वाश्रमीचा पती संजीव खन्ना आणि ड्रायव्हर श्याम राय यांनाही अटक करण्यात आले. या प्रकरणादरम्यान पोलीस आयुक्त राकेश मारिया यांची तडकाफडकी बदली करण्यात आली. राज्य शासनाने हे प्रकरणसुद्धा सीबीआयकडे वर्ग केले. आरोपपत्र दाखल होताच काही तासांत सीबीआयने इंद्राणीचे पती पीटर मुखर्जी यांनाही अटक केली.
गुन्हेगारीने हादरले वर्ष
By admin | Published: December 23, 2015 12:46 AM