Join us

एका दिवसांत ५४८ जणांविरुद्ध गुन्हे, ४३१ जणांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 07, 2020 6:31 PM

मुंबईत २९२ गुन्हे दाखल, सार्वजनिक ठिकाणी धरपकड़ सुरू 

मुंबई :  लॉकडाऊनच्या काळात कोरोनाबाबत प्रतिबंधात्मक उपायांचे उल्लंघन केल्याप्रकरणी सुरु असलेल्या कारवाईत सोमवारी ५४८ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करत ४३१ जणांना बेडया ठोकल्या आहेत. त्यामुले आतापर्यंतच्या कार्रवाइत आरोपींचा आकड़ा अडीच हजारावर  पोहचला  आहे.

मुंबईत २० मार्च ते ६  एप्रिल पर्यन्त १३३१ गुन्हे विविध पोलीस ठाण्यात दाखल झाले असून, उत्तर प्रादेशिक विभागात सर्वाधिक म्हणजे ४३० गुह्यांची नोंद आहे. सोमवारी कोरोनाचे संशयिताविरुद्ध आणखीन २ गुन्हे दाखल झाल्याने आतापर्यंत मुंबईत एकूण ८ गुन्हे दाखल झाले आहेत. तर , हॉटेल आस्थापना २८,, पान टपरी २१, इतर दुकाने ६९, हॉकर्स/ फेरीवाले २८, सार्वजनिक ठिकाणी गर्दी केल्याप्रकरणी ७३९ तर अवैध वाहतूक प्रकरणी ४३८ गुह्यांची नोंद करण्यात आली आहे. तर तब्बल ५४८ जणांविरुद्ध एकाच दिवशी म्हणजे सोमवारी गुन्हे दाखल करण्यात आले. ४३१ जणांना अटक करत जामिनावर सोडून देण्यात आले आहेत. आतापर्यंत तब्बल २५१८ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करत १९५८ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. तर ३८७ आरोपीना नोटीस देत सोडून देवून सोडन्यात आले असून १७३ पाहिजे आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.

आजही नागरिक डिमार्ट, भाजी मंडई परिसरात गर्दी करताना दिसत आहेत. कांजुरच्या डि मार्टमध्ये खरेदीसाठी आलेल्यांपैकी काही जण थेट सहा महिन्यांची खरेदी करताना दिसले. त्यामुळे या लोकांना कुठल्या भाषेत समजावयचे असा प्रश्न तेथे बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांना पडला आहे. 

टॅग्स :पोलिसगुन्हेगारी