‘त्या’ मद्याच्या दुकानांवर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:06 AM2021-04-15T04:06:45+5:302021-04-15T04:06:45+5:30
मालवणी पोलिसांची माहिती लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मद्याची विक्री ‘ऑनलाइन’ करण्याची परवानगी असूनही दुकानाबाहेर दारूचे पार्सल मालवणीतील वाईन ...
मालवणी पोलिसांची माहिती
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मद्याची विक्री ‘ऑनलाइन’ करण्याची परवानगी असूनही दुकानाबाहेर दारूचे पार्सल मालवणीतील वाईन शॉपकडून दिले जात होते. याप्रकरणी मालवणी पोलिसांनी तक्रार दाखल केली असून आरोपींना अटक करण्यात आली आहे.
मालवणीच्या गेट क्रमांक १ येथील जोसेफ लॉरेन्स वाईन शॉप उघडून ग्राहकांना मद्य विक्री केली जात होती. याबाबत पालिकेने मालवणी पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी दुकानाचा मॅनेजर राजेंद्र कदम याला अटक केली. याप्रकरणी ‘लोकमत’नेही ‘मद्य खरेदीसाठी मेडिकलच्या दुकानांसमोर गर्दी, औषध विक्रेत्यांना मनस्ताप’ या मथळ्याखाली ११ एप्रिल, २०२१ रोजीच्या अंकात वृत्त प्रसिद्ध केले होते. मालवणी म्हाडा येथील अरिहंत सोसायटी येथील सरोवर वाईन्स याठिकाणीही असेच प्रकार सुरू असल्याने त्याचीही दखल पोलिसांनी घेतली असून अप्पाकुमार मगानुरे (४८) विरोधात गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोघांचीही नंतर जामिनावर सुटका करण्यात आली.
......................................................
.........