मुंबई : पावसाने दिलेली ओढ आणि बदललेल्या हवामानामुळे मुंबईत लेप्टो, गॅस्ट्रो आणि स्वाइन फ्लू यांसारख्या साथीच्या रोगांनी हातपाय पसरण्यास सुरुवात केली आहे. जुलै महिन्यात आतापर्यंत लेप्टोने १६ जणांचा आणि स्वाइन फ्लूने ४ जणांचा बळी गेला असून, शुक्रवारी स्वाइन फ्लूचे १५ नवे रुग्ण आढळून आले. स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना हाती घेण्यात येत असल्या तरी नागरिकांनीही योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागाकडून केले जात आहे. स्वाइन फ्लूमुळे गुरुवारी दोन महिलांचा मृत्यू झाला. यातील एक महिला जुहूमध्ये राहणारी होती. तिला नायर रुग्णालयात दाखल केले होते. तर स्वाइन फ्लू झालेल्या वरळीतील ३२वर्षीय महिलेला मंगळवारी ग्लोबल रुग्णालयात दाखल केले होते.मार्च महिन्यात शहरात स्वाइन फ्लूची साथ मोठ्या प्रमाणात पसरली होती. मात्र प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि तापमान वाढीने स्वाइन फ्लूची साथ आटोक्यात आली. मात्र आता पुन्हा स्वाइन फ्लूने डोके वर काढल्याने आरोग्य यंत्रणेची झोप उडाली आहे. गेल्या तीन आठवड्यांमध्ये पाऊस न पडल्याने तापमानात वाढ झाली आहे. हवामानातील बदल साथीचे रोग पसरण्यास पोषक ठरत असून, ताप, गॅस्ट्रोग्रस्तांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. १ ते १५ जुलैमध्ये मुंबईत ३ हजार ५६३ तापाचे रुग्ण, गॅस्ट्रोचे ८२२ रुग्ण आणि स्वाइन फ्लूचे ७५ रुग्ण आढळले. जानेवारीपासून स्वाइन फ्लूच्या रुग्णांचा आकडा १ हजार ९०२पर्यंत गेला आहे. (प्रतिनिधी)पावसाळ््यात होणारे आजार स्वाइन फ्लू लक्षणेसर्दी, ताप, अंगदुखी, घशात खवखवणेस्वाइनपासून बचावासाठी... शिंकताना, खोकताना तोंडावर रुमाल धरा, पौष्टिक आहार घ्या, खाण्यापूर्वी साबणाने स्वच्छ हात धुवा, सार्वजनिक ठिकाणी थुंकू नका, फ्लूची लक्षणे असणाऱ्या व्यक्तीशी हस्तांदोलन करू नका, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळाताप :लक्षणे - कणकण, सुस्ती येणे, भूक मंदावणे, जास्त झोप येणे, उदासीनता येणे. लेप्टोस्पायरसिस : लक्षणे - थंडी वाजणे, तीव्र डोकेदुखी, स्नायू दुखणे, पोटदुखी, डोळे लाल होणे, काहीवेळा त्वचेवर रॅश येणे. गॅस्ट्रो : लक्षणे - पोटाच्या वरच्या भागात दुखणे, अन्नावरची इच्छा उडणे, उलट्या, ढेकरा येणे, भूक मंदावणे. कावीळ : लक्षणे - अस्वस्थता वाटणे, सांधे दुखी, ताप, उलट्या, अन्नावरची इच्छा उडणे, डोकेदुखी. टायफॉईड : लक्षणे - भूक कमी लागणे, डोकेदुखी, अंगदुखी, ताप (४ डिग्रीपर्यंत जाऊ शकतो), स्तुस्तपणा येणे, उलट्या होणे, अन्नावरची इच्छा उडणे.कॉलरा : लक्षणे - लूझ मोशन, डायरिया, अशक्तपणा येणे, डिहायड्रेशन, पोटदुखी. डासांमुळे होणारे आजार मलेरिया : लक्षणे - ताप, थंडी वाजणे, सांधे दुखणे, उलट्या होणे. डेंग्यू : लक्षणे - ताप, स्नायू दुखणे, सांधे दुखी, डोके दुखी, अन्नावरची इच्छा उडणे, पुरळ उठणे. चिकनगुनिया : लक्षणे - आठवडा किंवा त्यापेक्षा अधिक काळ ताप येणे, डोकेदुखी, तीव्र सांधेदुखी, अन्नावरची इच्छा उडणे किंवा उलट्या होणे, डोळ््यांचा दाह होणे.
साथीच्या रोगांचे संकट
By admin | Published: July 18, 2015 4:05 AM