पावसात साथीच्या आजारांचे संकट; २४ विभागांत आरोग्य शिबिरे

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2020 02:09 AM2020-06-15T02:09:59+5:302020-06-15T02:10:19+5:30

डासांच्या उत्पत्तीस कारणीभूत सर्वाधिक वस्तू भायखळा, मुंबई सेंट्रल, नागपाडा आणि वरळी, प्रभादेवी विभागात

The crisis of epidemics in the rains; Health camps in 24 departments | पावसात साथीच्या आजारांचे संकट; २४ विभागांत आरोग्य शिबिरे

पावसात साथीच्या आजारांचे संकट; २४ विभागांत आरोग्य शिबिरे

Next

मुंबई : एकीकडे कोरोनाशी लढणाऱ्या मुंबईला आता पावसाळ्यात साथीच्या आजारांचा सामना करावा लागणार आहे. या काळात मलेरिया, डेंग्यूसारखे आजार थैमान घालतात. त्यामुळे खबरदारी म्हणून यावर्षीपासून प्रत्येक रविवारी पालिकेच्या २४ प्रशासकीय विभागांमध्ये आरोग्य शिबिर आयोजित करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर या आजारांचा प्रसार करणाºया डासांच्या उत्पत्तीचे स्थान नष्ट करण्याची मोहीम कीटक नाशक विभागामार्फत तीव्र करण्यात आली आहे. यापैकी डासांच्या उत्पत्तीस कारणीभूत सर्वाधिक वस्तू भायखळा, मुंबई सेंट्रल, नागपाडा आणि वरळी, प्रभादेवी या विभागात आढळून आली आहेत.

बाटलीचं झाकण, टायर, थर्माकोल, नारळाच्या करवंट्या, वातानुकुलन यंत्रणा, डिफ्रॉस्ट ट्रे, रिकामी शहाळी, रोप कुंड्यांखालील ताटल्या यासारख्या विविध वस्तूंमध्ये साचलेल्या काही थेंब पाण्यातही डासांची उत्पत्ती होत असते. त्यामुळे १ जानेवारीपासून आतापर्यंत पाणी साचू शकतील अशा तब्बल एक लाख आठ हजार छोट्या - मोठ्या वस्तू आणि ५१४ टायर पालिकेच्या कीटकनाशक खात्याद्वारे हटविण्यात आले आहेत. डेंग्यू आणि मलेरियाच्या डासांची उत्पत्ती टाळण्यासाठी कोणत्याही वस्तू मध्ये पाणी साचू न देण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे.

सर्वाधिक टायर्स हटविलेले विभाग
टायर्समध्ये पावसाचे पाणी साचून त्यात डेंग्यू मलेरियाच्या डासांची उत्पत्ती स्थळे अनेकदा आढळून आली आहेत. महापालिकेच्या कीटकनाशक खात्याद्वारे गेल्या साडेपाच महिन्यातील कार्यवाहीत 'एफ दक्षिण' (परळ, एल्फिन्स्टन) सर्वाधिक म्हणजे १२३ टायर्स, त्याखालोखाल 'एन' (घाटकोपर) ९९ व 'एफ उत्तर’ (वडाळा, माटुंगा) ७१ टायर्स हटविण्यात आले आहेत. तर सर्व २४ विभागांतून ५१४ टायर्स हटविण्यात आले आहेत.

या विभागातून हटवल्या सर्वाधिक वस्तू (१ जानेवारी ते ११ जून पर्यंत)
विभाग नष्ट केलेल्या वस्तू
भायखळा, नागपाडा, मुंबई सेंट्रल १६ हजार ३५५ 
वरळी, प्रभादेवी नऊ हजार ३५८ 
कुलाबा, फोर्ट आठ हजार ३२

ही खबरदारी घ्या...
साचलेल्या पाण्यात डासांची मादी एकावेळी सुमारे १०० ते १५० अंडी घालते. या अंड्यांमधून डास उत्पन्न होण्यास साधारणपणे आठवड्याभराचा कालावधी लागतो. त्यामुळे दर आठवड्यात किमान एकदा आपल्या घरातील पाणी साठविण्याच्या भांडी, टाकी स्वच्छ करावी. 
आपल्या सोसायटीचा परिसर, सोसायटीतील बंद घरे, लिफ्टचे डक्ट, इमारतीची गच्ची अशा विविध ठिकाणांची आठवड्यातून एकदा तपासणी करून तिथे पाणी साचलेले नसल्याची खात्री करून घ्यावी.
अनेक घरांबाहेर पाण्याचे पिंप व ड्रम असतात. यात पाण्यात डेंग्यू आजार पसरविणाºया डासांच्या अळ्या आढळल्या आहेत. हे पिंप व इतर भांडी आठवड्यातून एक दिवस पूर्णपणे कोरडी करून उलटी ठेवावीत. 
हे पिंप व इतर भांडी कोरड्या व स्वच्छ कापडाने आतून पुसावीत. भांडी कोरड्या व स्वच्छ कापडाने पुसत असतांना ती दाब देऊन पुसावीत, जेणेकरून पिंपाच्या आतील बाजूला चिकटलेली डासांची अंडी नष्ट होतील. रविवारपासून आरोग्य शिबिर...‘चेस द व्हायरस' च्या धर्तीवर पावसाळी आजारांसाठी स्थानिक लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने सर्व २४ विभागांमध्ये वैद्यकीय शिबिरे आयोजित करण्यात येतील.

Web Title: The crisis of epidemics in the rains; Health camps in 24 departments

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.