लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यात सलग सहाव्या दिवशी १५ हजारांहून अधिक रुग्णांची नोंद झाल्याने कोरोनाचे संकट वाढत असल्याचे चित्र आहे. मंगळवारी १७,८६४ नवीन रुग्णांची नाेंद झाली असून ८७ मृत्यू झाले. त्यामुळे आता राज्यातील काेरोनाबाधितांची एकूण संख्या २३,४७,३२८ झाली असून बळींचा आकडा ५२ हजार ९९६ झाला आहे. सध्या १,३८,८१३ रुग्ण उपचाराधीन असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.
मंगळवारी दिवसभरात ९,५१० रुग्ण बरे होऊन घरी गेले. तर आतापर्यंत एकूण २१,५४,२५३ रुग्ण काेराेनामुक्त झाले. यामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९१.७७ टक्के झाले आहे.
सध्या राज्यातील मृत्युदर २.२६ टक्के आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,७७,१५,५२२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १३.२५ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ६,५२,५३१ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर ६,०६७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
दैनंदिन काेराेना रुग्णसंख्या
१६ मार्च - १७,८६४
१५ मार्च - १५,०५१
१४ मार्च - १६,६२०
१३ मार्च - १५,६०२
१२ मार्च - १५,८१७
११ मार्च - १४,३१७
१० मार्च – १३,६५९