मुंबई : लोकन्यायालयात येणारे खटले त्याचवेळी निकालात निघतील, असे नाही; पण हे खटल्यातून सकारात्मक मार्ग निघू शकतो, ही वृत्ती उभय पक्षांत निर्माण होणे, हेदेखील लोकन्यायालयाच्या प्रक्रियेचे यश म्हणावे लागेल. त्यामुळेच ही सकारात्मकता निर्माण करण्याची जबाबदारी लोकन्यायालयाने पार पाडावी, असे आवाहन लघुवाद न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश श्रीराम मोडक यांनी व्यक्त केले.राष्ट्रीय लोकअदालत कार्यक्रमांतर्गत मुंबईतील लघुवाद न्यायालय व वांद्रे न्यायालयात आयोजित करण्यात आलेल्या लोकन्यायालयाच्या उद्घाटनपर कार्यक्रमात ते बोलत होते. या लोकन्यायालयात खटल्यांची सुनावणी करून त्याच्यावर निर्णय देण्यात आले. एकूण ४१ खटले निकाली काढण्यात आले. लघुवाद न्यायालयाच्या या लोकअदालतमध्ये सहा पॅनेल्समध्ये १० न्यायमूर्ती, १० वकील व १० समाजसेवक सहभागी झाले होते. समाजसेवकांमध्ये विजय कासुर्डे, अशोक शिंदे, अभिजित यादव, प्रदीप कुशावर, आर. जी. देशमुख, सचिन इनामदार यांनी सहभाग घेतला. (प्रतिनिधी)
खटल्यात तडजोडीची सकारात्मकता निर्माण होणे आवश्यक - मोडक
By admin | Published: February 13, 2017 5:28 AM