४५० फूट उंचीचा वानरलिंगी सुळका पार करणारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 04:12 AM2021-01-08T04:12:52+5:302021-01-08T04:12:52+5:30

४५० फूट उंचीचा वानरलिंगी सुळका पार करणारा १० वर्षांचा कार्तिक मोरे मनोहर कुंभेजकर लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : ...

Crossing the 450-foot-high apical cone | ४५० फूट उंचीचा वानरलिंगी सुळका पार करणारा

४५० फूट उंचीचा वानरलिंगी सुळका पार करणारा

Next

४५० फूट उंचीचा वानरलिंगी सुळका पार करणारा

१० वर्षांचा कार्तिक मोरे

मनोहर कुंभेजकर

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : घाटकोपर येथील कामराजनगर येथे राहणारा, गुरुकुल शाळेत इयत्ता चौथीत शिकणारा तसेच सेंच्युरी क्लासेसचा विद्यार्थी कार्तिक भरत मोरे. आज १० वर्षांच्या या गिर्यारोहक वीराने जुन्नर येथील ४५० फूट उंचीचा वानरलिंगी सुळका पार करत अजून एक विक्रम स्वतःच्या नावावर करत घाटकोपरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला.

कार्तिकने वयाच्या सातव्या वर्षी स्वराज्याचे कारागृह असणा-या आकाशाशी स्पर्धा करणारा लिंगोबाचा डोंगर किल्ले लिंगाणा सर करणारा व वयाच्या आठव्या वर्षी किल्ले माहुलीच्या शेजारी रक्षक म्हणून उभा असणारा वजीर सुळका सर करत, लिंगाणावीर, वजीरचा बादशाह अशा नावाने गिर्यारोहण क्षेत्रात आपली वेगळी छबी उमटवत लहान वयात सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर खेळण्यात मग्न असणारा हा लिंगाणावीर कार्तिक मोरे.

वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत कार्तिकने आज वयाच्या दहाव्या वर्षी जुन्नर येथील जीवधन किल्ल्याचा पहारेकरी म्हणून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारा वानरलिंगी (खडापारशी) सुळका सर करून त्याच्या सुळक्यांच्या यादीत अजून एक चित्तथरारक सुळक्याची भर केली. या सुळक्यावर बऱ्याच गिर्यारोहकांची चढाईसाठी नेहमीच नजर असते.

सुळक्याच्या सर्वोच्च माथ्यावर पोहोचल्यावर भारताच्या तिरंगा ध्वजाला मानवंदना दिली तसेच रिलायन्स उद्योगसमूहाचे संस्थापक स्वर्गीय धीरूभाई अंबानी यांना आदरांजली वाहण्यात आली. त्याच्यासोबत त्याचे सहकारी चिराग कदम, समीर भिसे, मयूर वायदंडे व आदेश पाडेकर हे देखील होते.

हा सुळका सर करण्यासाठी पॉइंट ब्रेक ॲडव्हेंचरचे दत्ता साळुंके, चेतन शिंदे आणि टीम तसेच मुरबाड येथील वेदान्त व्यापारी यांच्या मदतीने शक्य झाले.

घाटघरच्या परिसरात असलेला हा पूर्वमुखी जीवधन किल्ला प्राचीन नाणेघाटाच्या व्यापारीमार्गाच्या संरक्षणासाठी उभारण्यात आला होता. नाणेघाटापासून जीवधन किल्ला अगदी हाकेच्या अंतरावर आहे. जीवधनच्या पायथ्याचे गाव म्हणजे घाटघर आहे तसेच आयताकार असणा-या गडाच्या टोकाला सुमारे ४५० फूट उंचीचा "वानरलिंगी" ऊर्फ खडापारशी नावाचा एक सुळका लक्षवेधी आहे.

-------------------------

Web Title: Crossing the 450-foot-high apical cone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.