मुंबई : कल्याण ते कसारादरम्यान सध्या दुहेरी मार्ग असल्याने मेल-एक्स्प्रेस गाड्यांना याच मार्गांचा वापर करावा लागतो. त्यामुळे लोकल फेऱ्यांना त्याचा फटका बसतो. हे पाहता रेल्वे मंत्रालयाने कल्याण ते कसारा तिसरा मार्ग याआधीच बनविण्याचा निर्णय घेतला होता. त्याला मागील अर्थसंकल्पात काही कामांसाठी किरकोळ निधी मंजूर झाल्यानंतर यंदा तब्बल १६0 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. कल्याण ते कसारा नव्या तिसऱ्या मार्गासाठी एकूण खर्च ७९२ कोटी रुपये एवढा आहे. यातील ८ मोठ्या पुलांच्या कामांसाठी मागील वर्षी रेल्वे अर्थसंकल्पात ३४ कोटी रुपये मिळाले होते. या आठही पुलांचे काम सुरू आहे. त्याचबरोबर २00 मोठ्या पुलांसाठी निविदा प्रक्रिया सुरू असून, यातील महत्त्वाच्या पुलांसाठी आणि काही तांत्रिक कामांसाठी ६९ कोटी रुपयांची निविदा अंतिम टप्प्यात आहे. याबाबत मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी नरेंद्र पाटील यांनी सांगितले की, सध्या या मार्गावरून लांब पल्ल्याचा गाड्याही जात आहेत. त्यामुळेच एकूणच परिस्थिती पाहता कल्याण-कसारा मार्ग २0१९पर्यंत बनविण्याचे टार्गेट ठेवण्यात आले आहे. (प्रतिनिधी)रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी २0१६-१७चा रेल्वे अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात त्यांनी मुंबई उपनगरीय मार्गावरील दोन एलिव्हेटेड कॉरिडोर प्रकल्पांची माहिती दिली. त्याचबरोबर एमयूटीपी-२मधील सुरू असलेल्या महत्त्वाच्या प्रकल्पांसाठी ७१0 कोटींच्या निधीला मंजुरी देतानाच आणि एमयूटीपी-३ची माहितीही दिली. याशिवाय उपनगरीय मार्गावरील महत्त्वाच्या प्रकल्प आणि सोयीसुविधांसाठी तब्बल २७५ कोटींपेक्षा जास्त कोट्यवधींचा निधीही मंजूर केला. त्यामुळे सुरू असलेल्या आणि पुढे सुरू होणाऱ्या प्रकल्पांना गती मिळेल, अशी आशा निर्माण झाली आहे.सरकते जिने आणि लिफ्ट बसणारमध्य रेल्वेने आणखी काही स्थानकांवर सरकते जिने आणि लिफ्ट बसविण्याची योजना आखली आहे. त्यासाठी निधीची आवश्यकता असल्याने जवळपास ३ कोटी ६0 लाख रुपये रेल्वे अर्थसंकल्पात मंजूर करण्यात आले आहेत. येत्या आर्थिक वर्षात मध्य रेल्वेवरील १५ स्थानकांवर सरकते जिने तर ७ स्थानकांवर लिफ्ट बसविण्यात येतील.रेल्वे स्थानकांवरील प्लॅटफॉर्मवर असलेल्या पादचारी पुलांच्या पायऱ्या चढताना ज्येष्ठ नागरिक, गरोदर महिला, आजारी रुग्णांना बराच त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे यातून सुटका करण्यासाठी मध्य रेल्वेने उपनगरीय मार्गांवरील स्थानकांवर सरकते जिने आणि लिफ्ट बांधण्याचे नियोजन केले. यातील काही स्थानकांवर सरकते जिने बांधण्यातही आले. आणखी १५ स्थानकांवर सरकते जिने बांधण्याचे नियोजन मध्य रेल्वेने केले आहे. त्यासाठी रेल्वे अर्थसंकल्पातून २ कोटी ३१ लाखांचा निधी मंजूर केला आहे.मात्र यात सुरुवातीला ६ स्थानकांवर १८ सरकते जिने बसविण्यात येतील. यात दादर स्थानकात ४, एलटीटीत ४, कल्याण स्थानकात २, घाटकोपरमध्ये २, ठाणे स्थानकात ४ आणि लोणावळा स्थानकात २ सरकते जिने बसतील. सीएसटीत २, दादरला ६, एलटीटीमध्ये १, घाटकोपरला २, ठाणे स्थानकात ३, डोेंबिवलीत २ आणि लोणावळा स्थानकात २ लिफ्ट बसवण्यात येतील.सोयीसुविधांसाठी पश्चिम रेल्वेला मिळाले २३ कोटी रुपयेपश्चिम रेल्वेवरील चर्चगेट-विरार एलिव्हेटेड प्रकल्प मार्गी लावतानाच उपनगरीय मार्गावरील स्थानकांच्या सोयीसुविधांसाठीही २३ कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी मंजूर करण्यात आला आहे. यात पादचारी पूल, सरकते जिने, प्लॅटफॉर्मची उंची वाढविण्यासाठी निधी मिळाल्याची माहिती पश्चिम रेल्वेकडून देण्यात आली. पश्चिम रेल्वेवरील अंधेरी आणि बोरीवली स्टेशन इमारतीची पुनर्बांधणी करण्याचा निर्णय घेतला आहे. ही इमारत बांधताना अनेक सोयीसुविधा वाढविण्यात येतील. त्यामुळे प्रवाशांची गैरसोयही टळणार आहे. त्याचबरोबर लोअर परेल, एलफिन्स्टन, गोरेगाव, वांद्रे, वसई रोड, नालासोपारा आणि विरार स्थानकात नवीन पादचारी पूल बांधण्यात येईल. मालाड, कांदिवली स्थानकांतही पादचारी पूल होणार आहे. पंधरा डब्यांच्या प्लॅटफॉर्म छतांसाठी २ कोटीमध्य रेल्वेवरील १५ डब्यांच्या प्लॅटफॉम छतांसाठी २ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. सीएसटी, भायखळा, कुर्ला, घाटकोपर, भांडुप, मुलुंड आणि डोंबिवली स्थानकात जलद १५ डबा लोकलला थांबा मिळतो. यात प्लॅटफॉर्मवरील छतांचे काम केले जाईल.
पायाभूत सुविधांवर ‘कोटींचा वर्षाव’
By admin | Published: February 27, 2016 2:27 AM