Join us

पुन्हा वांद्रे टर्मिनस परिसरात गर्दी : रेल्वे म्हणते, फक्त नोंदणीकृत प्रवाशांनाच परवानगी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2020 6:19 PM

स्थानकावर गर्दी न करण्याचे आवाहन 

 

मुंबई : बाहेरगावी जाण्यासाठी पुन्हा एकदा वांद्रे टर्मिनसवर मजुरांची गर्दी जमली होती. ही घटना मंगळवारी  दुपारी बारा वाजताच्या सुमारास घडली. त्यामुळे  रेल्वे परिसरात गोंधळाची स्थिती निर्माण झाली.  गर्दीला हटविण्यासाठी पोलीस दाखल झाले. काही कालावधीतच पोलिसांनी गर्दी नियंत्रणात आणली. यावर पश्चिम रेल्वे प्रशासन म्हणते की, फक्त नोंदणीकृत प्रवाशांनाच परवानगी श्रमिक विशेष ट्रेन मधून प्रवास करण्यास परवानगी आहे. स्थानकावर गर्दी न करण्याचे आवाहन पश्चिम रेल्वे प्रशासनाने केले आहे. 

पश्चिम रेल्वे मार्गावरील वांद्रे टर्मिनसवरून बिहारसाठी मंगळवारी दुपारी १२ वाजताचा सुमारास विशेष श्रमिक ट्रेन सुटली.  या ट्रेनसाठी साधारण १ हजार ७०० प्रवाशांनी नोंदणी केली होती. नोंदणीकृत कामगार, मजूर सकाळी ११ वाजेपासून वांद्रे टर्मिनसवर जमा झाले होते. रेल्वे प्रशासनाकडून नोंदणीकृत मजुरांची तपासणी करून रेल्वे स्थानकात प्रवेश देत होते. मात्र या मजुरांमध्ये अनेक प्रवाशांची नोंदणी झाली नव्हती. हे मजूर वांद्रे टर्मिनसवर जमा झालेले होते. त्यामुळे रेल्वे परिसरात गोंधळ उडाला होता. गर्दीला हटविण्यासाठी पोलीस दाखल झाले.  काही कालावधीतच पोलिसांनी गर्दी नियंत्रणात आणली आहे. दुपारी २ वाजेपर्यंत पोलिसांनी गर्दीवर नियंत्रण मिळवले होते. मात्र या घटनेमुळे पोलीस प्रशासन आणि रेल्वे प्रवाशांना नियोजन अभाव दिसून येत आहे. 

याआधी १४ एप्रिल २०२० रोजी वांद्रे टर्मिनस, स्थानक परिसरात गर्दी1 जमा झाली होती. पोलिसांना या गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी लाठीचार्ज करावा लागला होता. अनेकांवर गुन्हे नोंदविण्यात आले होते. 

--------------------------------------

फक्त नोंदणीकृत प्रवाशांना रेल्वे स्थानकावर बोलविण्यात आले होते. परंतु नोंदणी न केलेले आणि त्यांच्याशी संपर्क न  केलेले अनेक मजूर, कामगार, श्रमिक रेल्वे परिसरात,  बाहेर रस्तावर आणि पुलावर जमले होते.  नोंदणीकृत १ हजार ७००  प्रवाशांची  तपासणी करून रेल्वे स्थानकात प्रवेश करण्याची परवानगी देण्यात आली.  त्यानंतर १२ वाजता श्रमिक  ट्रेन  सोडण्यात आली. जमलेल्या गर्दीला स्थानिक पोलिसांच्या मदतीने हटविण्यात आले. 

रवींद्र भाकर, मुख्य जनसंपर्क अधिकारी, पश्चिम रेल्वे

--------------------------------------

पश्चिम रेल्वेने केले आवाहन  

स्थानकावरील सर्व तिकीट खिडक्या  बंद असल्याने कोणतेही तिकीट मिळत नाही. श्रमिक विशेष ट्रेनमध्ये राज्य सरकारकडे नोंदणी केलेल्या प्रवाशांनाच प्रवासाची परवानगी दिली जाते. त्यामुळे लोकांनी कोणत्याही कारणाशिवाय रेल्वे स्थानकाबाहेर  गर्दी करु नये,’ असे आवाहन पश्चिम रेल्वेने समाज माध्यमातून केले आहे. 

--------------------------------------

 

५ लाख मजुरांना  सुखरूप घरी  

सध्या देशभरात लॉकडाउनमध्ये देशात विविध ठिकाणी अडकलेल्या मजुरांना त्यांच्या गावी सोडण्यासाठी भारतीय रेल्वे प्रशासनाकडून कामगार दिनी म्हणजे १ मे रोजीपासून श्रमिक विशेष ट्रेन चालविण्यात येत आहेत.  सध्या देशात सर्वाधिक अडकून पडलेल्या मजुरांची संख्या महाराष्ट्रात फार मोठी आहे. सध्या मुंबईत  सर्वाधिक हाल स्थलांतरित मजुरांचे होत आहे,  त्यांना सुरक्षितघरी पोहचविण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत आहे. आतापर्यंत श्रमिक विशेष ट्रेन आणि एसटीचा माध्यमातून ५ लाख मजुरांना त्यांच्या गावी पाठवले आहे. 

--------------------------------------

 

 

टॅग्स :रेल्वेकोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरसमुंबई