चैत्यभूमीवर लोटली अनुयायांची गर्दी; प्रशासनाकडून तात्पुरत्या निवाऱ्याची सोय

By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2019 01:32 AM2019-12-06T01:32:11+5:302019-12-06T01:32:29+5:30

चैत्यभूमी परिसरात अनुयायी शांततेत रांगेत उभे राहून अभिवादन करण्यासाठी जात होते.

A crowd of followers on the field; Provision for temporary settlement by the administration | चैत्यभूमीवर लोटली अनुयायांची गर्दी; प्रशासनाकडून तात्पुरत्या निवाऱ्याची सोय

चैत्यभूमीवर लोटली अनुयायांची गर्दी; प्रशासनाकडून तात्पुरत्या निवाऱ्याची सोय

Next

मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६३ व्या महापरिनिर्वाण दिनी दादर येथील चैत्यभूमीवर लाखोंच्या संख्येने अनुयायी दाखल होत आहेत. गुरुवारी सकाळपासून चैत्यभूमीच्या बाहेर अनुयायींनी रांगा लावून तथागत गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.
चैत्यभूमी परिसरात अनुयायी शांततेत रांगेत उभे राहून अभिवादन करण्यासाठी जात होते. या अनुयायींनी पांढºया, निळ्या रंगाची वस्त्रे परिधान केली होती. राज्यासह देशाच्या विविध भागांतून अनुयायी शिवाजी पार्क येथील तात्पुरत्या निवाºयाखाली येत आहेत. समता सैनिक दल, भारतीय बौद्ध महासभा यांच्या वतीने अनुयायींना मार्गदर्शन करण्यात येत आहे.
महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रशासनाने चैत्यभूमी येथे येणाºया अनुयायींसाठी विविध सुविधा पुरविल्या आहेत. १ लाख चौरस फूट क्षेत्रफळाचा तात्पुरता निवारा उभा केला आहे. वैद्यकीय सुविधा, पिण्याच्या पाण्यासाठी टँकर्सची व्यवस्था केली आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या माहितीनुसार, चैत्यभूमी येथे गुरुवारी सायंकाळच्या आकडेवारीनुसार एक लाख ८० हजार अनुयायी येथे दाखल झाले आहेत. दरवर्षीप्रमाणे शिवाजी पार्क, दादर, चैत्यभूमी परिसरात यंदाही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा, पुस्तकांची दुकाने उभारण्यात आली आहेत.

‘शिक्षणासह शील महत्त्वाचे’
प्रत्येक मानवाचे शील जपले पाहिजे. शिक्षणासह शील महत्त्वाचे आहे. प्रत्येक माणसाचे मंगल व्हायला हवे. मनामधून अंधश्रद्धा घालविली पाहिजे, असे ३५ वर्षांपासून चैत्यभूमी येथे येणारे भन्ते कश्यप यांनी सांगितले.

Web Title: A crowd of followers on the field; Provision for temporary settlement by the administration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.