नगरसेवक गुंजाळ यांच्या अंत्यदर्शनाला गर्दी

By Admin | Published: December 27, 2015 01:03 AM2015-12-27T01:03:47+5:302015-12-27T01:03:47+5:30

मोरिवली गावात निर्घृण हत्या झालेले अंबरनाथचे नगरसेवक रमेश उर्फ पप्पू गुंजाळ यांच्यावर शनिवारी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. गुंजाळ यांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी

The crowd gathered at the funeral of corporator Gunjal | नगरसेवक गुंजाळ यांच्या अंत्यदर्शनाला गर्दी

नगरसेवक गुंजाळ यांच्या अंत्यदर्शनाला गर्दी

googlenewsNext

अंबरनाथ : मोरिवली गावात निर्घृण हत्या झालेले अंबरनाथचे नगरसेवक रमेश उर्फ पप्पू गुंजाळ यांच्यावर शनिवारी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. गुंजाळ यांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी हजारोंच्या संख्येने समर्थक आणि मित्र परिवार गावात दाखल झाला होता. जळगाव जिल्ह्यातूनही चार हजारांहून अधिक समर्थक अंबरनाथमध्ये आले होते.
गुंजाळ यांची शुक्रवारी सकाळी हत्या करण्यात आल्यानंतर शहरातील वातावरण तंग झाले होते. गुंजाळ यांच्यावर रात्री ८च्या सुमारास अंत्यसंस्कार करण्याची तयारी करण्यात येत होती. मात्र, त्यांचे मूळ गाव असलेल्या जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथून हजारो समर्थकांना त्यांचे अंत्यदर्शन घेण्याची इच्छा असल्याने त्यांचा अंत्यविधी शनिवारी सकाळी करण्याचे ठरले. मोरिवली गावात अंत्यदर्शनासाठी झालेल्या अलोट गर्दीमुळे अंत्यविधी दुपारी १२च्या दरम्यान करावा लागला. संपूर्ण ठाणे जिल्ह्यातून त्यांचे समर्थक
आणि मित्र परिवार या अंत्ययात्रेत सहभागी होते. सकाळी ११ पासून गावातून त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली.
शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंबरनाथच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, आमदार डॉ. बालाजी किणीकर, पाचोऱ्याचे आमदार किशोर आप्पा पाटील,
माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी, शहरप्रमुख अरविंद वाळेकर,
राजेंद्र वाळेकर, प्रदीप पाटील, सदाशिव पाटील यांच्यासह अनेक
नेते आणि पदाधिकारी उपस्थित
होते. (प्रतिनिधी)

हल्लेखोरांच्या अटकेसाठी
संतप्त समर्थकांचा ठिय्या
मोरिवली गावातून अंत्ययात्रा निघाल्यावर ज्या वेळेस शोकाकुल समर्थकांची गर्दी अंबरनाथ पोलीस स्टेशनसमोर आली, त्या वेळी हल्लेखोरांच्या अटकेची मागणी करत संतप्त समर्थकांनी कल्याण-बदलापूर मार्गावर ठिय्या आंदोलन सुरू केले. या अनपेक्षित प्रकारामुळे पोलिसांची धावपळ सुरू झाली. आरोपींना तत्काळ अटक करण्याची मागणी या समर्थकांनी केली. अखेर, पोलीस अधिकाऱ्यांनी समजूत घातल्यावर अंत्ययात्रा पुढे नेण्यात आली.

Web Title: The crowd gathered at the funeral of corporator Gunjal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.