वेळेच्या बंधनामुळे मंडईत होतेय गर्दी : रामदास आठवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:09 AM2021-04-30T04:09:11+5:302021-04-30T04:09:11+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कोरोना रोखण्यासाठी लॉकडाऊन आवश्यक आहे. या काळात किराणा दुकाने, भाजी मार्केट, अन्नधान्य जीवनावश्यक वस्तूंच्या ...

Crowds in the market due to time constraints: Ramdas Athavale | वेळेच्या बंधनामुळे मंडईत होतेय गर्दी : रामदास आठवले

वेळेच्या बंधनामुळे मंडईत होतेय गर्दी : रामदास आठवले

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोना रोखण्यासाठी लॉकडाऊन आवश्यक आहे. या काळात किराणा दुकाने, भाजी मार्केट, अन्नधान्य जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांना वेळेचे बंधन घातल्याने गर्दी होत आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रसार अधिक होत आहे. त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांसाठी आणि भाजी मार्केटसाठी वेळेचे बंधन न ठेवता दिवसभर ही दुकाने सुरू ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने त्वरित घ्यावा, अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली.

भाजीबाजार, अन्न धान्य, किराणा मालाची दुकाने सकाळी ७ ते सकाळी ११ पर्यंत खुली ठेवण्याचा चुकीचा नियम राज्य सरकारने सुरू केला आहे. या वेळेच्या बंधनामुळे सकाळी या दुकानांवर भाजीबाजारात मोठी गर्दी उसळत आहे. त्यातून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. जीवनावश्यक वस्तूंची दुकाने भाजीबाजार यांना वेळेचे बंधन न ठेवता कोरोना पसरू नये याची काळजी घेत मास्क आणि सुरक्षित अंतर राखण्याचे नियम पाळून दिवसभर सुरू ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घ्यावा. वेळेचे बंधन न ठेवल्यास दुकानांवर भाजीबाजारात गर्दी होणार नाही, असे मत आठवले यांनी व्यक्त केले.

................................

Web Title: Crowds in the market due to time constraints: Ramdas Athavale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.