राख्यांसाठी बाजारपेठांमध्ये गर्दी

By admin | Published: August 12, 2016 02:41 AM2016-08-12T02:41:03+5:302016-08-12T02:41:03+5:30

परंपरांनी पक्क्या केलेल्या नात्यांपैकी बहीण-भावाचे नाते अनोखे आणि अतूट असते. अगदी काहीच दिवसांवर बहीण-भावाच्या नात्याला घट्ट करणारा ‘रक्षाबंधन’

Crowds in the market for maintaining | राख्यांसाठी बाजारपेठांमध्ये गर्दी

राख्यांसाठी बाजारपेठांमध्ये गर्दी

Next

रामेश्वर जगदाळे/ सागर नेवरेकर , मुंबई
परंपरांनी पक्क्या केलेल्या नात्यांपैकी बहीण-भावाचे नाते अनोखे आणि अतूट असते. अगदी काहीच दिवसांवर बहीण-भावाच्या नात्याला घट्ट करणारा ‘रक्षाबंधन’ हा सण येऊन ठेपला आहे. त्यामुळे राख्यांच्या विविध प्रकारांनी बाजार झळाळून गेले आहेत. अनेकांनी आतापासूनच राख्यांच्या खरेदीला सुरुवात केली असून चिनी राख्यांसोबतच अस्सल देशी हॅण्डमेड राख्यांची मागणी अधिक असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. गिरगाव, लालबाग, दादर, माटुंगा, कुर्ला, मुलुंड अशा बाजारपेठा राख्यांनी सजल्या असून अशाच काही हटके राख्यांची विंडो शॉपिंग खास तुमच्यासाठी...

रत्नजडित राखी
अमेरिकन डायमंडला तारेत ओवून बनवलेला हा राखीचा प्रकार यंदा अनेकांच्या पसंतीला उतरत आहे. सुंदर व नाजूक अशी ही राखी डिझायनर लूक घेत असल्यामुळे इतर राखींच्या तुलनेत भाव खाऊन जात आहे. बाजारात या राखीची किंमत ४० पासून ते १०० रुपयांपर्यंत आहे.
गोंड्याची राखी
पारंपरिक खडे, मणी, शंख, शिंपले त्याचप्रमाणे गणपती व नारळ याचा वापर करून तयार केली जाणारी गोंड्याची राखी वेगवेगळ्या रंगांच्या धाग्यात व वेगवेगळ्या कलाकुसरीमध्ये यंदा उपलब्ध आहे. स्वस्त आणि मस्त असा हा राखीचा पर्याय असून या राखीची किंमत १० रुपयांपासून ते ५० रुपयांपर्यंत आहे.
कार्टुन राखी
सध्या पोकेमॉन गोची क्रेझ लक्षात घेता पोकेमॉन पात्रांची राखी अनेक लहानग्यांच्या पसंतीस उतरत आहे. पिकाचू, रायचू, जिगलीपफ अशा गोंडस पात्रांचा उपयोग करून या राख्या तयार करण्यात आल्या आहेत. याशिवाय छोटा भीम, मोटू-पतलू, डोरेमॉन, मिनियन्स आणि मुलांचे आवडते सुपरहीरो स्पायडरमॅन, बॅटमॅन आणि आयर्नमॅन यांची चलतीदेखील आहे.


लायटिंगची राखी
लहान भावांना राखी बांधायची झाली की, त्यांची राखी ही हटके हवीच. यंदा लहान मुलांचे लक्ष वेधण्यासाठी लाइट्स लावलेली राखी पाहायला मिळत आहे. बाहुले, खडे, हिरे व एलईडी लाइट यांचा वापर करून ही राखी बनविण्यात आली असून या राखी ८० रुपयांपासून पुढे आहेत.

लुंबा राखी
लुंबा राखी हा विशेष प्रकार गुजराती लोक आवर्जून खरेदी करतात. कारण गुजराती संस्कृतीप्रमाणे राखी बहीण भावाच्या बायकोला बांधते. यासाठी खास लुंबा राखीच खरेदी केली जाते. बाजारात या राखीची किंंमत साठ ते सत्तर रुपये आहे.

ब्रेसलेट राखी
मनगटाला ब्रेसलेटप्रमाणे घट्ट बसणारी अशी ही राखी अनेकांना आवडत आहे. याला गाठ मारण्याची आवश्यकता नसून केवळ एखाद्या कड्यासारखी ती हातात बसते. या राखीवरही अनेक कार्टून कॅरेक्टर बसवण्यात आले आहेत. ही राखी ५० ते ६० रुपयांपर्यंत आहे.'

रबर राखी
लहान मुले आपल्या हातात धाग्याची राखी खूप वेळ ठेवत नाहीत. त्यांच्यासाठी आकर्षण म्हणून रबरपासून बनवण्यात आलेली राखी अनेकांना आकर्षित करत आहे. फ्लोरोसंट रंगावर आकर्षित रंगीबेरंगी फुले व कार्टुन पात्र यावर लावण्यात आले असून या राखीची किंमत ७० रुपये आहे.

Web Title: Crowds in the market for maintaining

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.