Join us

मरेचे प्रवासी झाले टेकसॅव्ही; यूटीएस अ‍ॅपवरील तिकीट विक्रीतून मुंबई विभागाची लाखोंची कमाई

By ऑनलाइन लोकमत | Published: February 09, 2020 4:18 PM

यूटीएस मोबाईल अ‍ॅपला लोकप्रिय करण्यासाठी अनेक मोहिमे सुरू करण्यामध्ये मध्य रेल्वे, मुंबई विभागातील वाणिज्य विभाग आघाडीवर आहे. 

डोंबिवली -  मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने ८.२.२०२० रोजी यूटीएस अ‍ॅप वापरुन मोबाइल तिकिटांची आतापर्यंत सर्वाधिक विक्री नोंदविली आहे. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात याआधीचा दि. १६.१२.२०१९ रोजी नोंदविलेला ८.३३ लाखांचा विक्रम मागे टाकून दि. ८.२.२०२० रोजी यूटीएस मोबाईल अ‍ॅपचा वापर करून ९.११ लाख प्रवाशांनी तिकीट बुक करून नवीन विक्रम नोंदविला आहे. दि. ८.२.२०२० रोजी मुंबई विभागात बुक केलेल्या एकूण प्रवाशांपैकी हे प्रमाण ११.५% आहे.  मोबाईल तिकिट विक्रीतून मिळणारी कमाई ३३.३० लाख रुपये इतकी आहे, ज्याचे प्रमाण  १३.७९% आहे.

मध्य रेल्वेच्या इतर विभागांनीही यूटीएस मोबाईल अ‍ॅपला असाच प्रतिसाद नोंदविला आहे.  भुसावळ विभाग २११७ प्रवासी, नागपूर विभाग ५७३२ प्रवासी, पुणे विभाग ३८८२ प्रवासी आणि सोलापूर विभागातील ५९१ प्रवासी मोबाईल यूटीएसचा अ‍ॅप वरुन बुक केले.

यूटीएस मोबाईल अ‍ॅपला लोकप्रिय करण्यासाठी अनेक मोहिमे सुरू करण्यामध्ये मध्य रेल्वे, मुंबई विभागातील वाणिज्य विभाग आघाडीवर आहे.  प्रवाशांना यूटीएस अ‍ॅपची वैशिष्ट्ये, ते डाऊनलोड करण्याची प्रक्रिया आणि ते कसे वापरावे याबद्दल शिक्षित करण्यासाठी विविध  स्थानकांवर अनेक ड्राइव्ह चालवले गेले आहेत.  या व्यतिरिक्त तिकिट रोलवर, अ‍ॅनिमेटेड व्हिडिओ आणि रेडिओ जिंगल्सवर देखील यूटीएस अ‍ॅपची जाहिरात  केली जात आहे. याशिवाय ५% बोनस आणि यूटीएस अ‍ॅपद्वारे सीजन तिकिटांची सहजतेने होणारी बुकिंग याची मोठी प्रशंसा केली जात असल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी ए के सिंग, ए के जैन यांनी दिली. 

 

टॅग्स :मध्य रेल्वेमुंबई उपनगरी रेल्वेभारतीय रेल्वे