सीएसटी स्टेशनवर आग!

By admin | Published: June 28, 2014 01:53 AM2014-06-28T01:53:29+5:302014-06-28T01:53:29+5:30

संध्याकाळी साडे पाचच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा अंदाज आहे.

CST station fire! | सीएसटी स्टेशनवर आग!

सीएसटी स्टेशनवर आग!

Next
>मुंबई : मध्य रेल्वेच्या सीएसटी येथील प्रशासकीय इमारतीला संध्याकाळी साडे पाचच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा अंदाज आहे. आगीत जीवितहानी झाली नाही. मात्र मोठय़ा प्रमाणात वित्तहानी झाल्याचे सूत्रंनी सांगितले. 
सीएसटी येथे हार्बरच्या एक नंबर प्लॅटफॉर्मला लागूनच असलेल्या प्रशासकीय इमारतीच्या पाचव्या मजल्यावर कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, अकाउंट्स आणि  रेल्वे क्लेमचे कार्यालय आहे. सायंकाळी साडे पाचच्या सुमारास पाचव्या मजल्यावरील कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या कार्यालयाला अचानक आग लागली आणि हाहाकार उडाला. सहा मजल्यांच्या या इमारतीतील अनेक कार्यालये सायंकाळी साडे पाच वाजण्याच्या सुमारास बंद झाली होती. त्यामुळे इमारतीतील उर्वरित कार्यालयांत कामावरून घरी जाणा:या कर्मचा:यांची या घटनेमुळे धावपळ झाली. या घटनेची माहिती मिळताच आठ बंबगाडय़ा आणि सहा जम्बो टँकर घटनास्थळी पोहोचले. पाचव्या मजल्यावर ही आग असल्याने तीन उंच शिडय़ा असलेल्या अगिशमक दलाच्या गाडय़ाही मदतीसाठी पाठवण्यात आल्या आणि त्यानंतर अगिनशमन दलाच्या जवानांकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू झाले.
 या आगीचे रौद्ररूप पाहता मध्य रेल्वे प्रशासनाने सुरक्षेच्या कारणास्तव एक नंबर प्लॅटफॉर्मवरील लोकल सेवा बंद ठेवली. त्यामुळे हार्बर सेवा 15 मिनिटे उशिराने धावू लागल्या. या इमारतीच्या दुस:या बाजूला असणा:या रस्त्यावरील वाहतूकही काही वेळ बंद ठेवण्यात आली. सायं. 7च्या सुमारास आग आटोक्यात आल्यावर प्लॅटफॉर्म 1वरील वाहतूक पूर्ववत करण्यात आली. 
 
40 ते 50 जणांना सुरक्षित बाहेर काढले
आग लागली त्या वेळी इमारतीत साधारण 40 ते 50 जण होते. वा:याच्या वेगामुळे पाचव्या मजल्याला लागलेली आग वेगाने पसरत होती. आग लागताच या सर्वाना सुरक्षितपणो इमारतीबाहेर काढण्यात आल्याचे रेल्वेतील सूत्रंनी सांगितले.

Web Title: CST station fire!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.