Join us

सीएसटी-वडाळा ७२ तास बंद

By admin | Published: February 18, 2016 7:21 AM

हार्बरच्या सीएसटीतील बारा डब्यांसाठी प्लॅटफॉर्म आणि यार्ड नूतनीकरणाच्या कामासाठी १९ फेब्रुवारीपासून ७२ तासांचा ब्लॉक मुंबई रेल्वेविकास कॉर्पोरेशन आणि मध्य रेल्वेकडून निश्चित करण्यात आला आहे

मुंबई : हार्बरच्या सीएसटीतील बारा डब्यांसाठी प्लॅटफॉर्म आणि यार्ड नूतनीकरणाच्या कामासाठी १९ फेब्रुवारीपासून ७२ तासांचा ब्लॉक मुंबई रेल्वेविकास कॉर्पोरेशन (एमआरव्हीसी) आणि मध्य रेल्वेकडून निश्चित करण्यात आला आहे. हार्बरवर १९ फेब्रुवारीपासून घेण्यात येणारा ७२ तासांचा ब्लॉक २१ फेब्रुवारीपर्यंत घेण्यात येईल. या ब्लॉकला १८ फेब्रुवारीच्या मध्यरात्रीपासून सुरुवात होणार आहे. या दोन दिवशी सीएसटी ते वडाळा दरम्यान लोकलसेवा बंद राहील, तर वडाळापासून डाउन लोकलसेवा सुरू ठेवण्यात येणार असल्याचे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले. सध्या हार्बरवर नऊ डब्यांच्या लोकल धावत आहेत. पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या मेन लाइनवर बारा डब्यांच्या लोकल धावत असताना, हार्बरचे प्रवासी बारा डबा लोकलपासून वंचित होते. त्यामुळे हार्बरवर बारा डबा लोकल धावण्यासाठी प्लॅटफॉर्मची लांबी, जादा डबे आणि निधीची गरज होती. त्यानुसार, हार्बरवरील बारा डबासाठी लागणारी प्लॅटफॉर्मची कामे गेल्या वर्षभरापासून पूर्ण केल्यानंतर, सर्वात मोठे काम असलेल्या सीएसटी स्थानकाचे काम हे शेवटी हाती घेण्यात येणार होते. त्यानुसार, सीएसटी स्थानकात गेल्या काही दिवसांपासून किरकोळ काम केले जात असतानाच, आता १९ फेब्रुवारीपासून ७२ तासांचा ब्लॉक घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. १८ फेब्रुवारीच्या मध्यरात्री १.३0 वाजल्यापासून ब्लॉक घेऊन प्रथम सीएसटी स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक २ चे काम केले जाणार आहे. त्यामुळे हा प्लॅटफॉर्म बंद ठेवण्यात येत असला, तरी प्लॅटफॉर्म क्रमांक १ लोकल फेऱ्यांसाठी सुरूच ठेवण्यात येईल. (प्रतिनिधी)मध्य रेल्वेच्या मेन लाइनवर या ब्लॉकचा कोणताही परिणाम होणार नाही. या मार्गावरील लोकल नियमितपणे धावतील. ठाणे ते वाशी, पनवेल या ट्रान्स हार्बरवरील लोकलसेवेवरही परिणाम होणार नाही.२0 आणि २१ फेब्रुवारी रोजी हार्बरच्या प्रवाशांना व्हाया ठाणे, कुर्ला, दादरहून प्रवासासमुभा देण्यात आली आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक २ वरील काम हे किरकोळ स्वरूपाचे असल्याने १९ फेब्रुवारी रोजी ब्लॉककाळात हार्बरवरून ५९0 पैकी ४४५ लोकल फेऱ्या होतील. त्यामुळे या दिवशी प्रवाशांना फारसा मनस्ताप होणार नाही. मात्र, २0 आणि २१ फेब्रुवारी रोजी प्लॅटफॉर्म क्रमांक १ आणि २ दोनचे काम करताना सीएसटीवरील ट्रॅक क्रॉस ओव्हरचेही काम केले जाणार आहे. त्यामुळे या दोन्ही दिवशी सीएसटी ते वडाळा दरम्यानची हार्बर सेवा बंद राहील, अशी माहिती मध्य रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक अमिताभ ओझा यांनी दिली. या दोन्ही दिवशी सीएसटी-वडाळा दरम्यान सेवा सोडता हार्बरवरून ४८६ लोकल फेऱ्या होतील.१९ फेब्रुवारी रोजी सीएसटी हार्बर प्लॅटफॉर्म क्र. १ वरून लोकलसेवा सुरू राहतील. सीएसटी ते वान्द्रे पहिली लोकल ५.0४ वासीएसटी ते पनवेल पहिली लोकल ५.0८ वावान्द्रे ते सीएसटी पहिली लोकल ४.३0 वाबेलापूर ते सीएसटी पहिली लोकल ४.0१ वा.अंधेरी ते सीएसटी शेवटची लोकल २३.२६ वा.पनवेल ते सीएसटी शेवटची लोकल २३.२0 वा.सीएसटी ते वान्द्रे शेवटची लोकल 00.४१ वा. (१९ फेब्रुवारीच्या मध्यरात्री)ब्लॉक काळात वडाळा स्थानक हे सुरुवातीचे आणि अंतिम स्थानक असेल. २0 आणि २१ फेब्रुवारी रोजी नियोजनरोड ते नवी मुंबई, वान्द्रे दरम्यान विशेष लोकल चालविण्यात येतील.वडाळा ते पनवेल दरम्यान ८ मिनिटांनी लोकलवडाळा रोड ते बेलापूर आणि वडाळा रोड ते वाशी दरम्यान ३२ मिनिटांनंतर लोकल. वडाळा रोड ते वान्द्रे दरम्यान १६ मिनिटांनी लोकल. यात गर्दीच्या वेळेत १५ लोकल फेऱ्या तर इतर वेळेत १२ लोकल फेऱ्या होतील.