एक लाख तिवरांची लागवड; कांदळवन वाचविण्याची मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2020 02:30 AM2020-02-05T02:30:04+5:302020-02-05T02:30:20+5:30

तरूणाई सरसावली

Cultivation of one lakh tigers; A campaign to save Kandalavan | एक लाख तिवरांची लागवड; कांदळवन वाचविण्याची मोहीम

एक लाख तिवरांची लागवड; कांदळवन वाचविण्याची मोहीम

Next

मुंबई : कांदळवन विभागाच्या पुढाकाराने व युनायटेड वे मुंबईतर्फे ‘मिशन मँग्रोज’ हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. प्रकल्पांतर्गत २० हेक्टर जागा दत्तक घेऊन त्यात कांदळवनाची लागवड सुरू करण्यात आली आहे. आतापर्यंत सुमारे १ लाख ५ हजार तिवरांच्या रोपांची लागवड करण्यात आली आहे. या प्रकल्पामध्ये वेगवेगळ्या महाविद्यालयाचे तरुण-तरुणी जोडले गेले असून, मुंबई, ठाणे व नवी मुंबईसाठी कांदळवन किती महत्त्वाचे, याचे महत्त्व पटवून दिले जात आहे.

मिशन मँग्रोज प्रकल्पामध्ये सीवूड येथील करावे गावात १० हेक्टर जागा आहे, तर कोपरखैरणे येथील निसर्ग उद्यानजवळ १० हेक्टर जागा दत्तक घेण्यात आली असून, तिथे १ लाख ५ हजार तिवरांची रोपे लावण्यात आली आहेत, तसेच प्रकल्पांतर्गत शाळा व महाविद्यालयात जाऊन विद्यार्थ्यांना कांदळवनाचे महत्त्व मुंबईकरांसाठी का आहे? इत्यादी माहिती दिली जाते. तिवरांच्या रोपांची लागवड केल्यापासून २३ हेक्टर परिसर हिरवा झाला आहे. आतापर्यंत सुमारे ८ हजार ४०० लोक या प्रकल्पामध्ये जोडली गेली आहेत, अशी माहिती युनायटेड वे मुंबईचे कम्युनिटी इम्पॅक्ट -डायरेक्टर अजय गोवले यांनी दिली.

मुंबई ही कोस्टल सिटी असल्यामुळे जो कांदळवनाचा हिरवा पट्टा आपल्याभोवती आहे, तर हा हिरवा पट्टा संरक्षक भिंत म्हणून काम करतो. संरक्षक भिंतीला तडा गेला, तर काय होऊ शकते, हे २००५च्या पुरानंतर मुंबईकरांचे डोळे उघडले. पर्यावरणामध्ये कांदळवन हे एक प्रकारचे स्पंज म्हणून ओखळले जातात.कांदळवनाकडे दुर्लक्ष केल्यामुळे त्याचा त्रास आपल्याला भोगावा लागत आहे. गेल्या चार दशकांमध्ये ४० टक्के कांदळवने उद्ध्वस्त झाली आहेत. त्यामुळे आता नागरिकांनी पुढाकार घेऊन कांदळवनाचे जंगल वाढविणे गरजेचे आहे, असेही भाष्य अजय गोवले यांनी केले.
 

Web Title: Cultivation of one lakh tigers; A campaign to save Kandalavan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.