Join us

सांस्कृतिक दहशतवादविरोधी सत्यशोधक विचार परिषद

By ऑनलाइन लोकमत | Published: February 08, 2019 3:55 AM

बदलत्या सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, आर्थिक, धार्मिक पार्श्वभूमीवर कट्टरतावादाविरोधातील विचारवंत, लेखक आणि समातवाद्यांनी सांस्कृतिक दहशतवादविरोधी सत्यशोधक विचार परिषदेचे आयोजन केले आहे.

मुंबई  - बदलत्या सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, आर्थिक, धार्मिक पार्श्वभूमीवर कट्टरतावादाविरोधातील विचारवंत, लेखक आणि समातवाद्यांनी सांस्कृतिक दहशतवादविरोधी सत्यशोधक विचार परिषदेचे आयोजन केले आहे. परभणीत १३ फेब्रुवारीपासून सुरू होणारीही परिषद सोलापूर, पुणे, मुंबईतही आयोजित केली जाणार आहे. मुंबई मराठी पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेत या विचार परिषदेचे आयोजक लोकशाही जागर समितीने देशात अघोषित आणीबाणी सुरू असल्याचा आरोप करत संबंधित माहिती दिली.समितीचे निमंत्रक किशोल ढमाले म्हणाले की, परभणीत १३ फेब्रुवारी, सोलापूरमध्ये १४ फेब्रुवारी, पुण्यात २४ फेब्रुवारीला आणि २७ फेब्रुवारीला मुंबईत सांस्कृतिक दहशतवादाविरोधी परिषद पार पडेल.अशाप्रकारे येत्या दोन महिन्यांत विविध जिल्ह्यात एकूण १० परिषदा पार पडतील. या परिषदांमध्ये सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश पी.पी. सावंत, इतिहासाचे अभ्यासक प्रा. श्रीमंत कोकाटे, प्रा. गंगाधर बनबरे, सत्यशोधक स्त्रीवादी कार्यकर्त्या प्रतिमा परदेशी असे विविध मान्यवर सामील होतील.

टॅग्स :मुंबई