सप्टेंबर महिन्यात मुंबई बंदरात सांस्कृतिक कार्यक्रमांची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:08 AM2021-09-09T04:08:08+5:302021-09-09T04:08:08+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव संपूर्ण वर्षभर साजरा करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. त्यानुसार ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव संपूर्ण वर्षभर साजरा करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. त्यानुसार सर्व शासकीय कार्यालयांत विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. मुंबई पोर्ट ट्रस्टनेही यात पुढाकार घेतला आहे. त्यानुसार मुंबई बंदरात सप्टेंबर महिन्यात सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची मांदियाळी असेल.
सप्टेंबरमध्ये योग शिबिर, व्यायाम आणि आहार नियोजन वर्ग, स्वसंरक्षण तंत्र आणि हिंदी दिवस असे कार्यक्रम घेण्यात येतील. त्याशिवाय सर्जनशील लेखकांना प्रोत्साहन देण्यासाठी लेखन स्पर्धा घेतली जाईल. बंदर स्वच्छता, पाणी वाचवा मोहीम आणि हरित आणि सुरक्षित बंदर याविषयी वेबिनारचे आयोजनही केले जाईल.
ऑगस्टमध्येही पोर्ट ट्रस्टने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले. त्यात घोषवाक्य, रांगोळी, चित्रकला स्पर्धेचा समावेश होता. हे सर्व कार्यक्रम पोर्ट ट्रस्ट निवासी वसाहत ‘नाडकर्णी पार्क’ पार पडले. मुंबई पोर्ट ट्रस्टचे कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी त्यात सहभाग घेतला.