कॅन्सर बरा करायचा? कार टी सेल थेरपी घ्या..; केमोथेरपीला ठरणार नवा पर्याय

By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2022 09:27 AM2022-12-08T09:27:40+5:302022-12-08T09:28:03+5:30

टाटा रुग्णालयातील संशोधनात आतापर्यंत सहा रुग्णांवर ही उपचारपद्धती वापरण्यात आली आहे.

Cure cancer? Take car T cell therapy..; A new alternative to chemotherapy | कॅन्सर बरा करायचा? कार टी सेल थेरपी घ्या..; केमोथेरपीला ठरणार नवा पर्याय

कॅन्सर बरा करायचा? कार टी सेल थेरपी घ्या..; केमोथेरपीला ठरणार नवा पर्याय

Next

स्नेहा मोरे
मुंबई : कर्करुग्णांवरील उपचार पद्धती म्हणून जगभरात ख्यातकीर्द असलेली ‘कार टी सेल’ उपचार पद्धती आता देशात प्रथमच टाटा मेमोरिअल रुग्णालयातही उपलब्ध होणार आहे. या उपचार पद्धतीचे संशोधन गेल्या ८-९ महिन्यांपासून टाटा रुग्णालयात सुरू असून, कोट्यवधींचा खर्च काही लाखांत शक्य होणार आहे. संशोधनाच्या सुरुवातीच्या टप्प्यात झालेल्या चाचणीत कोणत्याही रुग्णाला अतिदक्षता विभागाची आवश्यकता भासली नाही वा दुष्परिणाम आणि मृत्यूही झालेला नाही. त्यामुळे येत्या काळात ही पद्धती कर्करुग्णांसाठी वरदान ठरणार आहे.

टाटा रुग्णालयातील संशोधनात आतापर्यंत सहा रुग्णांवर ही उपचारपद्धती वापरण्यात आली आहे. अनेकदा केमोथेरपीदरम्यान कर्करुग्णांना शरीरासह  मानसिक त्रासातून जावे लागते, या उपचारपद्धतीमुळे याचे प्रमाण कमी होणार आहे. याविषयी, अधिक माहिती देताना टाटा रुग्णालय (अकॅडेमिक) संचालक डॉ. श्रीपाद बानावली यांनी सांगितले, परदेशात यासाठी अडीच-तीन कोटींचा खर्च येतो, देशात सुरुवातीच्या काळात याकरिता दीड कोटीपर्यंतचा खर्च येईल. त्यानंतरच्या काळात राष्ट्रीय स्तरावरील नियमनानंतर हा खर्च १० लाखांपर्यंत करण्यात येईल. या उपचार पद्धतीमुळे रुग्णाचा आजार पुन्हा येण्याचा धोका कमी होऊ शकतो, त्याचप्रमाणे पुढील ५-६ वर्षांत भरमसाठ देण्यात येणाऱ्या केमोथेरपीचे प्रमाणही यामुळे कमी होईल. 

कार टी सेल उपचार पद्धत म्हणजे ?
या माध्यमातून शरीरातील पांढऱ्या पेशींना औषधोपचारांच्या माध्यमातून रोगप्रतिकारक शक्तींमध्ये बदलवण्यात येते. त्यामुळे या पेशी शरीरातील कर्करोग पेशींना मारण्यासाठी उद्युक्त होतात. टी पेशी रुग्णाच्या रक्तातून गोळा केल्या जातात आणि मानवनिर्मित रिसेप्टरसाठी जनुक जोडून प्रयोगशाळेत अनुवांशिकरीत्या सुधारित केले जातात, ज्याला काइमरिक प्रतिजन रिसेप्टर किंवा ‘सीएआर’ म्हणतात. हे विशिष्ट कर्करोग पेशी प्रतिजन ओळखण्यात मदत करते. त्यानंतर, सीएआर टी पेशी रुग्णाला परत केल्या जातात. 

 आयआयटीचेही योगदान
टाटासह आयआयटी मुंबई यांनीही ही उपचार पद्धती यशस्वी करण्यासाठी योगदान दिले आहे. आयआयटी मुंबईने देशातील पहिली स्वदेशी बनावटीची कार टी सेल उपचार पद्धती विकसित केली आहे. या चाचणीसाठी वापरण्यात आलेले एचसीएआर १९ या उत्पादनाची निर्मिती आयआयटी मुंबईने केली. आयआयटी मुंबईचे सहयोगी प्राध्यापक डॉ. राहुल पुरवार यांनी सीएआर-टी प्लॅटफॉर्म विकसित केले आहे. तर पेटेंटेड अँटी सीडी १९ सीएआर-टी हे उत्पादन विकसित करण्यात आले आहे.

Web Title: Cure cancer? Take car T cell therapy..; A new alternative to chemotherapy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Tataटाटा