मुंबईत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३ टक्के
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2020 04:25 AM2020-12-15T04:25:03+5:302020-12-15T04:25:03+5:30
मुंबई : मुंबईत दिवसभरात काेराेनाचे ५३३ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर आतापर्यंत २ लाख ६६ हजार ६९५ ...
मुंबई : मुंबईत दिवसभरात काेराेनाचे ५३३ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर आतापर्यंत २ लाख ६६ हजार ६९५ रुग्ण कोरोनामुक्त झाले. त्यामुळे मुंबईत बरे झालेल्या रुग्णांचे प्रमाण ९३ टक्के असून रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी ३२७ दिवसांवर पोहोचला आहे.
मुंबईत दिवसभरात काेराेनाच्या ४७७ रुग्णांचे निदान झाले असून ७ मृत्यूंची नोंद झाली. परिणामी, कोरोनाबाधितांची एकूण संख्या २ लाख ८७ हजार ३०३ वर पोहोचली आहे. आतापर्यंत १० हजार ९८८ इतक्या रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. शहर, उपनगरात रविवारपर्यंत कोरोनाच्या २१ लाख २७५ चाचण्या झाल्या आहेत.
मुंबईत चाळ व झोपडपट्टीच्या वस्तीत ४३९ सक्रिय कंटेन्मेंट झोन्स आहेत, तर सक्रिय सीलंबद इमारती ४ हजार ९२४ आहेत. मागील २४ तासांत पालिकेने रुग्णांच्या सहवासातील २ हजार ९१७ सहवासितांचा शोध घेतला आहे.
दिलासा; मुंबईत रुग्ण दुपटीचा कालावधी वाढला
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोना नियंत्रणात आला असून मुंबईतील रुग्ण दुपटीच्या कालावधीत १३ दिवसांत १०५ दिवसांनी वाढ झाली आहे.
पालिकेच्या आरोग्य विभागाने राबवलेल्या विविध उपाययोजनांमुळे कोरोना नियंत्रणात येत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मुंबईत रुग्ण दुपटीच्या कालावधीत वाढ हाेत असल्याची दिलासादायक बाब आहे. १ नोव्हेंबरला रुग्ण दुपटीचा कालावधी घसरत २१३ दिवसांवर पोहोचला होता. तर रुग्णवाढीचे सरासरी प्रमाण ०.३३ टक्क्यांवर पोहोचले होते.