राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२.७० टक्क्यांवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2020 04:19 AM2020-12-04T04:19:15+5:302020-12-04T04:19:15+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : राज्यात काेराेना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२.७० टक्क्यांवर पोहोचले असून, सध्या मृत्यूदर २.५८ टक्के ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यात काेराेना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२.७० टक्क्यांवर पोहोचले असून, सध्या मृत्यूदर २.५८ टक्के आहे. राज्यात गुरुवारी काेराेनाच्या ५ हजार १८२ रुग्णांचे निदान झाले असून, ११५ मृत्यूंची नोंद झाली. परिणामी, बाधितांची एकूण संख्या १८ लाख ३७ हजार ३५८ झाली आहे, तर मृतांचा आकडा ४७,४७२ आहे.
राज्यात दिवसभरात ८,०६६ रुग्ण बरे होऊन घरी गेले, तर आतापर्यंत १७ लाख ३ हजार २७४ रुग्ण कोरोनामुक्त झाले. सध्या ८५,५३५ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी १० लाख ५९ हजार ३०५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १६.६१ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५ लाख ४८ हजार १३७ व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून, ५ हजार ९३९ व्यक्ती संस्थात्मक अलगीकरणात आहेत.