राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.७५ टक्क्यांवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 04:07 AM2021-01-14T04:07:31+5:302021-01-14T04:07:31+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : राज्यात दिवसभरात काेराेनाचे ३ हजार ९ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत १८ ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यात दिवसभरात काेराेनाचे ३ हजार ९ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत १८ लाख ७४ हजार २७९ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.७५ टक्क्यांवर पोहोचले असून, सध्या ५२ हजार ३६५ रुग्ण उपचाराधीन आहेत.
राज्यात बुधवारी ३ हजार ५५६ रुग्ण आणि ७० मृत्यूंची नोंद झाली. परिणामी, बाधितांची एकूण संख्या १९ लाख ७८ हजार ४४ असून एकूण मृत्यू ५० हजार २२१ झाले आहेत. सध्या राज्यात २ लाख २६ हजार ५९९ व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून २ हजार ४९६ व्यक्ती संस्थात्मक अलगीकरणात आहेत.
राज्यात सर्वाधिक उपचाराधीन रुग्ण पुण्यात असून, ही संख्या १५ हजार ४२७ आहे. त्याखालोखाल ठाण्यात ९ हजार ९८९ तर मुंबईत ७ हजार ५२० रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
..............................