राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५ टक्के
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:07 AM2021-01-25T04:07:52+5:302021-01-25T04:07:52+5:30
उपचाराधीन रुग्णांच्या संख्येत घट लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : राज्यात काेराेनाचे ३,६९४ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, ...
उपचाराधीन रुग्णांच्या संख्येत घट
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यात काेराेनाचे ३,६९४ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, आतापर्यंत एकूण १९,१०,५२१ रुग्ण काेरोनामुक्त झाले. यामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.२२ टक्के एवढे झाले. मागील काही दिवसांच्या तुलनेत उपचाराधीन रुग्णांची संख्या घटत आहे. सध्या एकूण ४३,८७० रुग्ण उपचाराधीन आहेत.
राज्यात शनिवारी २,६९७ नवीन काेराेना रुग्णांचे निदान आणि ५६ मृत्यूंची नोंद झाली. परिणामी, कोरोनाबाधितांची एकूण संख्या २०,०६,३५४ झाली असून, मृत्यूचा आकडा ५०,७४० झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.५३ टक्के आहे. दिवसभरात नोंद झालेल्या एकूण ५६ मृत्यूंपैकी ४१ मृत्यू हे मागील ४८ तासांतील, तर ८ मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. उर्वरित ७ मृत्यू हे एक आठवड्यापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत.
या ५६ मृत्यूंमध्ये मुंबई १०, ठाणे मनपा २, कल्याण डोंबिवली मनपा १, उल्हासनगर मनपा ६, भिवंडी निजामपूर मनपा १, मीरा-भाईंदर मनपा २, पनवेल मनपा १, अहमदनगर मनपा २, नंदूरबार ४, पुणे ५, पुणे मनपा ५, पिंपरी चिंचवड मनपा १, सोलापूर २, सोलापूर मनपा २, सातारा ५, जालना २, उस्मानाबाद १, नागपूर २, नागपूर मनपा १, गडचिरोली १ या रुग्णांचा समावेश आहे.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,४१,४५,८२९ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २०,०६,३५४ (१४.१८ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
सध्या राज्यात २,१३,६७८ व्यक्ती होमक्वारंटाइन, तर १,९९३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.
--------------------