राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.१३ टक्क्यांवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 04:07 AM2021-01-22T04:07:05+5:302021-01-22T04:07:05+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : राज्यात गुरुवारी ३,९८० रुग्ण बरे होऊन घरी गेले, तर आजपर्यंत एकूण १९,०३,४०८ रुग्ण काेराेनामुक्त ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यात गुरुवारी ३,९८० रुग्ण बरे होऊन घरी गेले, तर आजपर्यंत एकूण १९,०३,४०८ रुग्ण काेराेनामुक्त झाले. यामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.१३ टक्के झाले आहे. राज्यातील उपचाराधीन रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट झाली असून सध्या केवळ ४५ हजार ६२२ सक्रिय रुग्ण आहेत.
राज्यात गुरुवारी २,८८६ नवीन रुग्णांचे निदान झाले, तर ५२ मृत्यूंची नोंद झाली. परिणामी काेरोनाबाधितांची एकूण संख्या २० लाख ८७८ झाली असून बळींचा आकडा ५०,६३४ आहे.
गुरुवारी नोंद झालेल्या ५२ मृत्यूंमध्ये मुंबई १०, ठाणे १, रायगड १, पनवेल मनपा १, नाशिक मनपा २, अहमदनगर मनपा १, जळगाव मनपा १, पुणे १, पुणे मनपा ५, पिंपरी-चिंचवड मनपा १, सोलापूर १, सातारा २, औरंगाबाद मनपा ११, बुलढाणा २, नागपूर १, नागपूर मनपा ४, वर्धा १, भंडारा ४, गडचिरोली १ आणि अन्य राज्य/देशातील १ इतक्या रुग्णांचा समावेश आहे.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,४०,१९,१८८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २०,००,८७८ (१४.२७ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २,१२,०२३ व्यक्ती होमक्वारंटाइन, तर १,९३६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.
....................