खबरदारीचा उपाय म्हणून ११ जूनपर्यंत मुंबईत जमावबंदी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2023 06:37 AM2023-05-30T06:37:15+5:302023-05-30T06:37:37+5:30

पाच किंवा अधिक व्यक्तींच्या कोणत्या संमेलनास प्रतिबंध घालण्यात आले आहेत.

Curfew in Mumbai till June 11 as a precautionary measure | खबरदारीचा उपाय म्हणून ११ जूनपर्यंत मुंबईत जमावबंदी

खबरदारीचा उपाय म्हणून ११ जूनपर्यंत मुंबईत जमावबंदी

googlenewsNext

मुंबई : पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून ११ जूनपर्यंत शहरात जमावबंदीच्या आदेशात वाढ केली आहे. मुंबईपोलिसांच्या अभियान विभागाचे उपायुक्त विशाल ठाकूर यांनी २६ मे रोजी एका प्रसिद्धिपत्रकाच्या माध्यमातून हे बंदी आदेश दिले आहेत.

आदेशानुसार, शहरात सार्वजनिक शांतता बिघडविणे, मानवी जीवनास धोका आणि मालमत्तेची हानी पोहोचविणाऱ्या घटना टाळण्यासाठी तसेच कोणत्याही प्रकारची दंगल रोखण्यासाठी पाच किंवा अधिक व्यक्तींच्या हालचाली आणि बेकायदेशीरपणे एकत्र येण्यावर निर्बंध घालणारे प्रतिबंधात्मक आदेश आवश्यक आहेत.

मुंबई पोलिसांच्या आदेशानुसार, पाच किंवा अधिक व्यक्तींच्या कोणत्या संमेलनास प्रतिबंध घालण्यात आले आहेत. तसेच, कोणत्याही व्यक्तीची कोणतीही मिरवणूक काढू नये. कोणत्याही मिरवणुकीत लाऊडस्पीकर, वाद्ये, बँड वाजविण्यास आणि फटाके फोडण्यास बंदी घालण्यात आली आहे. या आदेशांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे नमूद करण्यात आले.

Web Title: Curfew in Mumbai till June 11 as a precautionary measure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.