मुंबई : पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून ११ जूनपर्यंत शहरात जमावबंदीच्या आदेशात वाढ केली आहे. मुंबईपोलिसांच्या अभियान विभागाचे उपायुक्त विशाल ठाकूर यांनी २६ मे रोजी एका प्रसिद्धिपत्रकाच्या माध्यमातून हे बंदी आदेश दिले आहेत.
आदेशानुसार, शहरात सार्वजनिक शांतता बिघडविणे, मानवी जीवनास धोका आणि मालमत्तेची हानी पोहोचविणाऱ्या घटना टाळण्यासाठी तसेच कोणत्याही प्रकारची दंगल रोखण्यासाठी पाच किंवा अधिक व्यक्तींच्या हालचाली आणि बेकायदेशीरपणे एकत्र येण्यावर निर्बंध घालणारे प्रतिबंधात्मक आदेश आवश्यक आहेत.
मुंबई पोलिसांच्या आदेशानुसार, पाच किंवा अधिक व्यक्तींच्या कोणत्या संमेलनास प्रतिबंध घालण्यात आले आहेत. तसेच, कोणत्याही व्यक्तीची कोणतीही मिरवणूक काढू नये. कोणत्याही मिरवणुकीत लाऊडस्पीकर, वाद्ये, बँड वाजविण्यास आणि फटाके फोडण्यास बंदी घालण्यात आली आहे. या आदेशांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे नमूद करण्यात आले.