मेट्रो चाचणीची उत्सुकता आणखी शिगेला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:06 AM2021-05-26T04:06:37+5:302021-05-26T04:06:37+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे मुंबईच्या पश्चिम उपनगरांत उभारण्यात येत असलेल्या मेट्रोची ट्रायल रन ...

Curiosity about the metro test intensified | मेट्रो चाचणीची उत्सुकता आणखी शिगेला

मेट्रो चाचणीची उत्सुकता आणखी शिगेला

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे मुंबईच्या पश्चिम उपनगरांत उभारण्यात येत असलेल्या मेट्रोची ट्रायल रन जवळपास सोमवारी (दि. २४) घेण्याचे निश्चित झाले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची यासाठीची वेळ निश्चित झाल्यावर मुंबईच्या पश्चिम उपनगरांत ऑक्टोबर महिन्यात धावणाऱ्या मेट्रो रेल्वेची चाचणी ३१ मे रोजी घेतली जाईल. दुसरीकडे, मुंबईकरांनादेखील मेट्रोच्या ट्रायल रनची उत्सुकता लागली असून, या दोन्ही मेट्रो सुरू झाल्यानंतर प्रवाशांचा वेळ वाचण्यासह प्रवास जलदगतीने होईल, असा दावा प्राधिकरणाने केला आहे.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे मुंबईच्या पश्चिम उपनगरात मेट्रो २ अ आणि मेट्रो ७ चे काम हाती घेण्यात आले आहे. गेल्या दीडएक वर्षापासून कोरोना असतानादेखील प्राधिकरणाने या दोन्ही मेट्रोचे काम अत्यंत वेगाने सुरू ठेवले आहे. आज या दोन्ही मेट्रो रेल्वेची सर्व कामे अंतिम टप्प्यात आली आहेत. मेट्रो रेल्वेची चाचणी घेण्यासाठी सर्व तयारीदेखील झाली आहे. ओव्हरहेड वायर चार्ज करण्यासह इतर सर्व कामांना पूर्णत्वाचे स्वरूप आले आहे. परिणामी मुंबईच्या पश्चिम उपनगरातील मेट्रो आता चाचणीसाठी सज्ज झाली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या सोमवारी, मेट्रो रेल्वेची चाचणी होण्याची दाट शक्यता आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे स्वतः या चाचणीला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. त्यांची वेळ आणि चाचणीसाठीचा दिवस अशा दोन्ही गोष्टी जुळून आल्या की, चाचणीदरम्यान मेट्रो रेल्वे मुंबईकरांना धावताना दिसेल. दुसरीकडे, मुंबईकरांनाही मेट्रोच्या चाचणीची उत्सुकता लागली आहे; कारण या मेट्रोमुळे पश्चिम आणि पूर्व उपनगरे जोडली गेली आहेत. आता पश्चिम उपनगरांत नव्याने मेट्रोचे हे दोन्ही मार्ग सुरू झाल्या तर लोकलवर पडणारा ताण कमी होईल; आणि मुंबईकरांना आणखी जलद गतीने प्रवास करता येईल, असा दावा प्राधिकरणाने केला आहे.

Web Title: Curiosity about the metro test intensified

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.