‘चलन हे इतिहासाच्या अवलोकनाचे माध्यम’

By admin | Published: April 24, 2016 04:36 AM2016-04-24T04:36:11+5:302016-04-24T04:36:11+5:30

चलन हे इतिहासाच्या अवलोकनाचे महत्त्वपूर्ण माध्यम असून, नाणी, नोटा, स्टॅम्प्स यातून त्या-त्या काळातील संस्कृती प्रतिबिंबित होते, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केले.

'Currency is the medium of historical observation' | ‘चलन हे इतिहासाच्या अवलोकनाचे माध्यम’

‘चलन हे इतिहासाच्या अवलोकनाचे माध्यम’

Next

मुंबई : चलन हे इतिहासाच्या अवलोकनाचे महत्त्वपूर्ण माध्यम असून, नाणी, नोटा, स्टॅम्प्स यातून त्या-त्या काळातील संस्कृती प्रतिबिंबित होते, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केले.
‘मिन्टेज वर्ल्ड डॉट कॉम’ या आॅनलाइन म्युझियमच्या संकेतस्थळाचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कफ परेड येथील एक्सपो सेंटर येथे करण्यात आले, त्या वेळी ते बोलत होते. याप्रसंगी मिन्टेज वर्ल्डचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुशीलकुमार अग्रवाल, कझाद तोडिवाला उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले, ‘सिंधू संस्कृतीमध्ये नाण्यांना विशेष महत्त्व होते. तेव्हांही नाण्यांच्या माध्यमातून आवश्यक देवाण-घेवाण व्हायची. नाण्यांचे जतन, संरक्षण हे महत्त्वपूर्ण कार्य आहे. प्रत्येकाला इतिहासाची माहिती असायला हवी. इतिहास वाचून व त्यापासून बोध घेऊन पुढे जाण्याची गरज आहे. या क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी मिन्टेज वर्ल्डच्या माध्यमातून नवा प्लॅटफॉर्म तयार झाला आहे.
या वेळी मुख्यमंत्र्यांनी नाणी, नोटा व स्टॅम्प्सच्या प्रदर्शनाची पाहणी केली.
मिन्टेज वर्ल्ड आॅनलाइन म्युझियमच्या माध्यमातून नाणी, नोटा आणि स्टॅम्प्स यांना एकाच छताखाली आणण्याचा प्रयत्न जगात पहिल्यांदाच करण्यात आला असून, संग्रह करणाऱ्यांसाठी, विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी तसेच छंद जोपासण्यासाठी हे संकेतस्थळ उपयोगी असल्याचे सुशीलकुमार अग्रवाल यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: 'Currency is the medium of historical observation'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.