मुंबापुरीतील बाजारात सध्या बाहुबली राख्यांची चलती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2017 03:16 AM2017-08-01T03:16:02+5:302017-08-01T03:16:04+5:30

बहीण-भावाचे नाते अनोखे आणि अतूट असते. अगदी काही दिवसांवर बहीण-भावाच्या नात्याला घट्ट करणारा ‘रक्षाबंधन’ हा सण येऊन ठेपला आहे.

Currently the Bahubali rickshaws run in the Mumbai market | मुंबापुरीतील बाजारात सध्या बाहुबली राख्यांची चलती

मुंबापुरीतील बाजारात सध्या बाहुबली राख्यांची चलती

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : बहीण-भावाचे नाते अनोखे आणि अतूट असते. अगदी काही दिवसांवर बहीण-भावाच्या नात्याला घट्ट करणारा ‘रक्षाबंधन’ हा सण येऊन ठेपला आहे. त्यामुळे बाजारात विविध प्रकारच्या राख्या झळकू लागल्या आहेत. अनेकांनी आत्तापासूनच राख्यांच्या खरेदीला सुरुवात केली आहे. राख्यांसोबतच देशी हॅण्डमेड राख्यांची मागणी अधिक असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
दादर, गिरगाव, लालबाग, माटुंगा, कुर्ला, मुलुंड या बाजारपेठा राख्यांनी सजल्या आहेत. यंदा बाजारात बाहुबलीच्या राखीला सर्वाधिक मागणी असल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात येत आहे. तर गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी बाजारात राख्यांना बरीच मागणी आहे. त्यामुळे यंदा वेगवेगळ्या प्रकारच्या राख्यांचा माल दुकानात भरलेला आहे. दररोज राख्यांसाठी दुकानात ग्राहकांची गर्दी वाढत आहे, असे दादरमधील राखी विक्रेता गोविंदा वैश्य यांनी सांगितले.
बाहुबली राखी
बाहुबली चित्रपटाने जगभरात चांगली कमाई करून विक्रम नोंदवला आहे. त्याच पार्श्वभूमीवर रक्षाबंधन निमित्ताने बाहुबली राखीचा ट्रेंड बाजारात गाजत आहे. बाहुबली राखीमध्ये लहान मुलांसाठी बाहुबलीचे चित्रस्वरूपात असलेली राखी पाहायला मिळते. तसेच वेगवेगळ्या प्रकारच्या बाहुबली राख्या बाजारात उपलब्ध आहेत. बाहुबली राखीची किंमत ४० रुपयांपासून ते ५० रुपयांपर्यंत आहे. बाजारात सर्वांत जास्त किमतीची बाहुबली राखी ४५० रुपयांपर्यंत उपलब्ध आहे.
बांबू राखी
बाजारात या वर्षी खास आकर्षण बांबूच्या राख्यांचे आहे. शहराच्या जवळपास राहणाºया आदिवासी पाड्यांतील आदिवासी बांधव या राख्या नैसर्गिक घटकांचा वापर करून तयार करतात. तसेच बाजारातदेखील राख्या काही ठिकाणी उपलब्ध आहेत. बांबू राखीची बाजारातील किंमत २० रुपयांपासून ते ३० रुपयांपर्यंत आहे.
लुंबा राखी
लुंबा राखी हा विशेष प्रकार गुजराती लोक आवर्जून खरेदी करतात. गुजराती संस्कृतीमध्ये नणंद ही भावजयीला लुंबा राखी बांधते. लुंबा राखीची बाजारात किंमत ५० ते ८० रुपयांपर्यंत आहे.
देव राखी
मराठी संस्कृतीमध्ये देव राखी हादेखील राखीचा प्रकार पाहायला मिळतो. देव राखी देवाला बांधली जाते. बाजारात देव राखीला मोठी मागणी असते. साधारण देव राखी बाजारात १० रुपये डझन किमतीला उपलब्ध आहे.
ब्रेसलेट राखी
हाताच्या मनगटाला ब्रेसलेटप्रमाणे घट्ट बसणारी अशी ही राखी अनेकांना आवडत आहे. राखीला अनेक कार्टून कॅरेक्टर्स आणि रत्नजडित हिरे-माणके बसविण्यात आलेले आहेत. बाजारात ही राखी ५० रुपयांपासून पुढे आहे. तसेच मोरपिसी राखी ३० रुपये, फुलांची राखी ६० रुपये, हिºयांची राखी ६०, कासव राखी ४० रुपये अशा प्रकारच्या विविध राख्या बाजारात उपलब्ध आहेत.
रत्नजडित राखी
अमेरिकन डायमंड हा राखीचा प्रकार यंदा अनेकांच्या पसंतीला उतरत आहे. सुंदर व नाजूक अशी ही राखी डिझायन लूक घेत असल्यामुळे इतर राख्यांच्या तुलनेत भाव खाऊन जात आहे. बाजारात या राखीची किंमत १८० रुपयांपासून ते २०० रुपयांपर्यंत आहे.
गोंड्याची राखी
गोंड्याची राखी पारंपरिक खडे, मणी, शंख व शिंपले तसेच गणपती आणि नारळ यांचा वापर करून तयार केली जाणारी गोंड्याची राखी वेगवेगळ्या रंगीबेरंगी धाग्यांत व वेगवेगळ्या कलाकुसरीमध्ये यंदा उपलब्ध आहे. स्वस्त आणि मस्त असा हा राखीचा प्रकार असून, या राखीची किंमत ५ रुपयांपासून ते ५० रुपयांपर्यंत आहे. तसेच बाजारात गोंडा ३० रुपये डझन आहे.
कार्टून राखी, घड्याळाची राखी
बाजारात डोरेमॉन, पोकेमॉन, छोटा भीम, अँग्री बर्ड, मिनियन, मोटू पटलू आणि वीर अशा कार्टून स्वरूपाच्या राख्या लहान मुलांचे लक्ष वेधून घेत आहेत. साधारणपणे बाजारात या राख्यांची किंमत १५ रुपयांपासून ते ६० रुपयांपर्यंत आहे. तसेच लहान मुलांसाठी घड्याळाची राखीदेखील बाजारात उपलब्ध आहे. घड्याळाच्या राखीची किंमत ६० रुपये आहे.

Web Title: Currently the Bahubali rickshaws run in the Mumbai market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.