'सध्या राज्यात राज्यघटनेची पायमल्ली सुरु आहे'; उद्धव ठाकरेंचा भाजपावर घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2022 11:09 PM2022-07-11T23:09:47+5:302022-07-11T23:10:09+5:30

उद्धव ठाकरे यांनी आज मातोश्रीवर पुण्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधला.

'Currently, the state is in the process of violating the Constitution'; Former CM Uddhav Thackeray lashes out at BJP | 'सध्या राज्यात राज्यघटनेची पायमल्ली सुरु आहे'; उद्धव ठाकरेंचा भाजपावर घणाघात

'सध्या राज्यात राज्यघटनेची पायमल्ली सुरु आहे'; उद्धव ठाकरेंचा भाजपावर घणाघात

Next

मुंबई- शिवसेनेच्या तब्बल ४० आमदारांनी एकनाथ शिंदे यांची साथ देत भाजपसोबत सत्ता स्थापन केली. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची, तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी केलेल्या बंडाच्या पार्श्वभूमीवर आता शिवसेनेला पुन्हा नव्यानं उभारी देण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दररोज नेते आणि पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेत आहे. 

उद्धव ठाकरे यांनी आज मातोश्रीवर पुण्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधला. यावेळी आता माझ्याकडे तुम्हाला देण्यासाठी काहीही नाही. परंतु तुमची ताकद सध्या मला हवी आहे. मला तु्म्ही साथ द्या, आपण पु्न्हा उभे राहू, असं उद्धव ठाकरे उपस्थित पदाधिकाऱ्यांना म्हणाले.

भाजपाचा शिवसेनेला संपवण्याचा डाव असल्याचा आरोप उद्धव ठाकरेंनी यावेळी केला. हिंमत असेल, तर मध्यावधी निवडणुका घेऊन दाखवा, असं आव्हानही उद्धव ठाकरेंनी यावेळी दिलं. तसेच राज्यात राज्यघटनेची सध्या पायमल्ली सुरु आहे, असं विधानही उद्धव ठाकरेंनी केलं. 

दरम्यान, राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत आम्ही सर्व खासदारांसोबत बोलून नक्की कोणाला पाठिंबा द्यायचा, यावर निर्णय घेऊ, असं शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं होतं. त्यानंतर आज उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेनेच्या लोकसभा आणि राज्यसभेच्या खासदारांची मातोश्रीवर बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत सर्व खासदारांचं मत जाणून घेतलं. 

शिवसेनेतून १२ खासदार बाहेर पडण्याच्या तयारीत- केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे

१२ खासदार शिवसेना पक्षातून बाहेर पडण्याच्या तयारीत असल्याचं मोठं विधान केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केलं आहे. रावसाहेब दानवे यांनी आज जालन्यात माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी हे विधान केलं आहे. तसेच आगामी निवडणुकीच्या दृष्टीने शिंदे गटातील नेत्यांशी चर्चा करु आणि त्यांना आगामी निवडणुकीत सहभागी करू, असं रावसाहेब दानवेंनी सांगितलं. राष्ट्रपतीपदासाठी उद्धव ठाकरे हे द्रौपदी मुर्मू यांना देत असतील तर आम्ही त्यांच स्वागत करु, असं मत देखील रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केलं आहे.

Web Title: 'Currently, the state is in the process of violating the Constitution'; Former CM Uddhav Thackeray lashes out at BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.