करी रोड पूल वाहतुकीसाठी खुला

By admin | Published: September 17, 2015 03:00 AM2015-09-17T03:00:23+5:302015-09-17T03:00:23+5:30

मोनोरेलच्या कामानिमित्त वाहतुकीसाठी गेले अनेक महिने बंद असलेला करीरोड रेल्वे स्थानकावरील उड्डाणपूल मंगळवारी वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.

Curry Road Bridge is open for vehicular traffic | करी रोड पूल वाहतुकीसाठी खुला

करी रोड पूल वाहतुकीसाठी खुला

Next

मुंबई : मोनोरेलच्या कामानिमित्त वाहतुकीसाठी गेले अनेक महिने बंद असलेला करीरोड रेल्वे स्थानकावरील उड्डाणपूल मंगळवारी वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. मात्र तरीही लोअर परळ उड्डाणपूलावरील वाहतूक कोंडी ‘जैसे थे’ आहे.
रस्त्यावरून चालणाऱ्या नागरिकांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्याचे चित्र पाहायला मिळाले. परिणामी नागरिकांनी पदपथाचा वापर करण्याचे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे. तर गेले अनेक दिवसांपासून चिंचपोकळी उड्डाणपुलाचा वापर करणाऱ्या वाहनचालकांनी करीरोड उड्डाणपुलाचा वापर करण्याचे आवाहनही वाहतूक पोलिसांनी केले आहे.
दरम्यान, करीरोड पुलामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावरील वाहतुकीला दिलासा काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. लालबाग आणि गणेश गल्ली येथील गणपतीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांमुळे या मार्गावर प्रचंड वाहतूककोंडी होते. मात्र करीरोड पुलाच्या पर्यायाने वाहनचालकांना दिलासा मिळाला असून, काही प्रमाणात येथील वाहतूककोंडी कमी होईल, असे सांगण्यात येते.

Web Title: Curry Road Bridge is open for vehicular traffic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.