Join us

तीने सँडलमध्ये लपवले होते १६ लाखाचे सोने

By मनोज गडनीस | Published: March 20, 2024 5:15 PM

एका भारतीय महिलेने तिच्या सँडलमध्ये सोन्याची चेन लपवत त्याची तस्करी केल्याचे आढळून आले. तिच्या सँडलमध्ये तिने २४० ग्रॅम वजनाच्या दोन चेन लपवल्या होत्या.

मुंबई - मुंबई विमानतळावर गेल्या काही दिवसांपासून सोने तस्करीमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली असून तस्करांतर्फे तस्करीसाठी अनेक नवनव्या क्प्लृप्त्या लढवल्या जात आहेत. मंगळवारी स्पाईसजेटच्या विमानाने दुबईतून मुंबईत दाखल झालेल्या एका भारतीय महिलेने तिच्या सँडलमध्ये सोन्याची चेन लपवत त्याची तस्करी केल्याचे आढळून आले. तिच्या सँडलमध्ये तिने २४० ग्रॅम वजनाच्या दोन चेन लपवल्या होत्या.

या सोन्याची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत १६ लाख रुपये इतकी आहे. गेल्या दोन दिवसांत मुंबई विमानतळावर १ कोटी ४६ लाख रुपयांचे सोने जप्त करण्यात आले आहे. मिक्सरच्या भांड्यात, फळाच्या ज्यूसच्या डब्यात, मोबाईलसाठी वापरल्या जाणाऱ्या इयरपॉडमधून तस्करांनी सोने तस्करी केल्याचे यापूर्वी आढळून आले आहे. तर सोन्याची पावडर व पेस्ट यांची देखील मोठ्या प्रमाणात तस्करी पकडण्यात येत आहे.

टॅग्स :मुंबईसोनंतस्करी