पूनम गुरव - नवी मुंबईमराठी संस्कृतीमध्ये गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला जातो. या दिवसापासून मराठी वर्षाला सुरुवात होती. प्रत्येक घरासमोर डौलाने उंचच-उंच गुढी उभारून हा सण साजरा केला जातो. शहरी भागामध्ये विकास आणि उंच इमारतीच्या नावाखाली घरासमोरील अंगण नाहीसे झाले. जागेची कमतरता आणि ग्राहकांची गरज लक्षात घेऊन बाजारात छोट्या गुढ्या विक्रीसाठी उपलब्ध असून त्याला ग्राहकांची मोठी पसंती मिळत आहे. शहरी भागात उंच-उंच इमारती आहेत. त्यामुळे फ्लॅटमध्ये राहणाऱ्या लोकांना गुढी उभारण्यासाठी जागेची कमतरता भासते म्हणूनच आता बाजारपेठेत अगदी चार फूट उंचीपासून उंचच - उंच तयार केलेल्या गुढ्या दाखल झाल्या आहेत. याला ग्राहकवर्गाची अधिक पसंतीही मिळत आहे. ह्या गुढ्या तयार स्वरूपात असल्याने घरी नेऊन गुढीपाडव्याला फक्त विधिवत पूजा करायची असते. अगदी चार फुटांपासून तयार गुढी मिळत असल्याने घराच्या बाहेर किंवा खिडकीमध्ये गुढी उभारून तिची पूजा करता येत असल्याने गुढी उभी करण्यासाठी जागेचा प्रश्न सुटला आहे. तसेच यांची किंमतही २५० रुपयांपासून पुढे असल्याने ग्राहकांची मागणी त्याला अधिक आहे. तयार गुढीलाच धातूचा तांब्या, रेशमी कापड, साखरेची गाठी बांधूनच दिली जात आहे. अशा प्रकारच्या गुढ्या सध्या वाशीतील एपीएमसी घाऊक बाजारपेठ आणि किरकोळ बाजारपेठेत उपलब्ध झाल्या आहेत. ज्या ग्राहकांना तयार गुढी घ्यायची नसेल अशांसाठी कमी उंचीचे बांबूही बाजारपेठेत उपलब्ध आहेत. रेशमी कापड, साखरेची गाठी, धातूचा तांब्या, फुले, हळद, कुंकू, चंदन, चाफ्याच्या फुलांची माळ, आंब्याची डहाळी, कडूलिंब इत्यादी साहित्य उपलब्ध आहे. अगदी गुढीला लागणाऱ्या बांबूपासून ते फुलांपर्यंत सर्व काही बाजारपेठेत एकाच ठिकाणी मिळत आहे. त्याचबरोबर गुढी उभारताना लागणारी साखरेची गाठीही विविध आकारामध्ये आणि रंगांमध्ये मिळत आहे. यात चांदणी, सूर्य, बाहुली आदींच्या आकारात पांढऱ्या, गुलाबी, पिवळ्या रंगांमध्ये उपलब्ध आहे.बाजारपेठेत तयार गुढ्या सहज मिळत असल्याने ग्राहकांची गुढी उभारताना निर्माण होणाऱ्या समस्यांतून सुटका झाली आहे. तसेच या गुढ्यांची उंची कमी असून, गुढी उभारणीसाठी लागणारे सर्व साहित्य त्याच्यासोबतच मिळत आहे. ग्राहकांना प्रत्येक साहित्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला लागत नाही. त्यामुळे ग्राहक तयार गुढ्यांना अधिक पसंती देत आहेत. गुढीपाडव्याच्या दिवशी ही गुढी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत दारासमोर डौलाने उभी करतात. गुढीला ब्रह्मध्वज असेही म्हटले जात असून, बाजारपेठेत गुढीपाडव्याच्या खरेदीसाठी ग्राहकांनी एकच गर्दी केली आहे. बचत गटांचाही सहभाग च्असमी क्रिएशन बचत गटाच्या माध्यमातून नवी मुंबईसह, ठाणे रायगड जिल्ह्यातील महिलांनी एकत्रित येवून गुढीपाडव्यानिमित्त लहान गुढ्या तयार करण्याचा व्यवसाय सुरू केला आहे. वाशी येथील रघुलीला मॉलमध्ये त्यांनी गुढ्या आणि पुजासाठी लागणाऱ्या साहित्यांचे स्टॉल उभारले आहेत.च्या गुढ्यांची उंची १ फुटांपासून पुढे आहे. यंदा प्रथमच बचत गटातील महिलांनी कौशल्याचा वापर करून घरगुती आणि कच्च्या मालापासून आकर्षक गुढ्या बनविल्या आहे. घराची सजावट आणि पुजाचे साहित्याबरोबरच साखरगाठी, रांगोळी या वस्तूही स्टॉलवर उपलब्ध असल्याचे बचत गटाच्या अध्यक्षा प्रीती कदम यांनी सांगितले.
छोट्या गुढ्यांना ग्राहकांची पसंती
By admin | Published: March 18, 2015 10:43 PM