Join us

४३ वीज बिल भरणा केंद्रांवर ग्राहकांचा ‘भार’

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2018 1:05 AM

उपनगरात लाखो ग्राहक; ऑनलाइनचा पर्याय, तरीही यंत्रणेवर ताण

मुंबई : पूर्व आणि पश्चिम उपनगरातील वीज ग्राहकांना ‘शॉक’ देणाऱ्या अदानी या वीज कंपनीचे एकूण वीज ग्राहक २३ लाख असून, या लाखमोलाच्या वीज ग्राहकांना वीज बिल भरता यावे म्हणून कंपनीची पूर्व आणि पश्चिम उपनगरात केवळ ४३ वीज बिल भरणा केंद्रे आहेत. २३ लाख वीज ग्राहकांपैकी १८ लाख ग्राहक हे अदानीचे थेट ग्राहक असून, ५ लाख ग्राहक हे चेंज ओव्हर म्हणजे टाटाचे आहेत. दरम्यान, वीज ग्राहकांना वीज बिल भरता यावे म्हणून अदानीने ऑनलाइनवर भर दिला असला तरी प्रत्यक्षात असणारी ४३ वीज बिल भरणा केंद्रे ग्राहक संख्येच्या तुलनेत कमी आहेत.मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम उपनगरात अदानीकडून ४०० चौरस किलोमीटर क्षेत्रात वीजपुरवठा केला जातो. अदानी पूर्व आणि पश्चिम उपनगरात एकूण तीन विभाग केले असून, या तीन विभागांमध्ये वांद्रे ते मीरा-भार्इंदर हा एक विभाग, चुनाभट्टी ते कुर्ला, मानखुर्द, घाटकोपर, चेंबूर हा दुसरा विभाग आणि तिसºया विभागात कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी या परिसरांचा समावेश होतो. तीन विभागांत पुन्हा पाच झोन करण्यात आले असून, या पाच झोनमध्ये दक्षिण विभाग, दक्षिण मध्य विभाग, पूर्व विभाग, मध्य विभाग आणि उत्तर विभाग यांचा समावेश होतो. या संपूर्ण परिसरातील नागरिकांना वीज बिलाचा भरणा करता यावा यासाठी एकूण ४३ वीज बिल भरणा केंद्रे आहेत. मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम उपनगरातील अदानीच्या ४३ वीज बिल भरणा केंद्रांत रोख रक्कम, धनादेश, क्रेडिट आणि डेबिट कार्डद्वारे वीज ग्राहकांना आपल्या वीज बिलाचा भरणा करता येत आहे. याव्यतिरिक्त संकेतस्थळ आणि अ‍ॅपच्या माध्यमातूनदेखील वीज ग्राहकांना वीज बिलाचा भरणा करता येत आहे. नेट बँकिंग, वॉलेट्स, यूपीआय, एनईएफटी/आरटीजीएस, कॅश कार्ड, गुगल पे, फोन पे, भारत क्युआर कोड, यूपीआय क्यूआर कोड ही वीज भरण्यासाठी वापरण्यात येणाºया साहित्याची वैशिष्ट्ये आहेत. भीम पे-भीम अ‍ॅप, भारत बिल पेमेंट सिस्टीम, पेमेंट गेट वे, अ‍ॅमेझॉन पे यांवरूनही वीज ग्राहकांना वीज बिलाचा भरणा करता येत आहे.वीज ग्राहकांना सुविधा, पे पॉइंट, सहकारी बँकांमध्येही वीज बिलाचा भरणा करता येत असून, पोस्ट कार्यालयांतही रोख रकमेद्वारे वीज बिल भरण्याबाबतच्या सुविधा उपलब्ध आहेत. विविध कार्यालये आणि सोसायट्यांच्या आवारात ड्रॉप बॉक्स बसविण्यात आले असून, ग्राहक सेवा केंद्राद्वारे याची आवश्यक माहिती वीज ग्राहकांना दिली जाते. महत्त्वाचे म्हणजे अदानीचे जेवढे ग्राहक आहेत; त्या ग्राहकांकडून भरल्या जाणाºया वीज बिलाच्या रकमेपैकी ४६ टक्के व्यवहार हा ऑनलाइन होत असल्याचा दावा कंपनीने केला असून, अत्याधुनिक तंत्राच्या मदतीने यात अधिकाधिक सुधारणा केली जात असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले.अदानी इलेक्ट्रिसिटीकडून वीज ग्राहकांना नियमित दरापेक्षा वाढीव दराने प्राप्त झालेल्या वीज बिलांच्या अनुषंगाने तपासणी आणि उपाययोजनांबाबत शिफारस करण्यासाठी दोन सदस्यीय समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, समितीमध्ये माहिती आयुक्त अजित जैन आणि तांत्रिक विषयातील तज्ज्ञ विजय सोनवणे यांचा समावेश आहे. ही समिती अदानीबरोबरच बेस्ट, टाटा पॉवर, महावितरण अशा अन्य वीज वितरण परवानाधारकांकडून मुंबई आणि मुंबई उपनगरातील या कालावधीत देण्यात आलेल्या देयकांचाही तुलनात्मक अभ्यास करेल. समितीने पुढील दोन ते तीन महिन्यांत आयोगाला आपला अहवाल देणे अपेक्षित आहे.विजेची मागणी आणि वापरही वाढलाआॅगस्ट महिन्याचे वीज बिल मागील महिन्यांच्या वीज बिलांच्या तुलनेत अधिक आल्याने साहजिकच वीज ग्राहक संतापले. याच काळात सप्टेंबर आणि आॅक्टोबर महिन्यात उकाड्यात वाढ झाल्याने विजेची मागणी वाढली आणि विजेचा वापरही वाढला. विजेचा वापर वाढल्याने साहजिकच विजेच्या बिलात वाढ झाली. वीज बिलांचा झटका बसल्याने वीज ग्राहकांनी संताप व्यक्त केला.सरासरी वीज बिल आणि ग्राहकांचा असंतोषरिलायन्सकडून विजेचा कारभार अदानीकडे जात असतानाच रिलायन्सकडून महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाकडे वीज दरवाढीचा प्रस्ताव दाखल करण्यात आला होता. वीज दरवाढीचा प्रस्ताव मंजूर होईपर्यंत अदानीने विजेचा कारभार रिलायन्सकडून हाती घेतला होता. याच काळात अदानीकडून वीज ग्राहकांना जी आॅगस्ट महिन्याची वीज बिले पाठविण्यात आली; ती वीज बिले मागील तीन महिन्यांच्या सरासरीवर काढण्यात आली.प्रश्न सुटणारबिलिंगसंबंधी प्रश्नांची दखल घेण्यासाठी १ डिसेंबरपासून कांदिवली, भार्इंदर, वांद्रे, चेंबूर, गोरेगाव, एमआयडीसी अंधेरी, अंधेरी पश्चिम आणि साकी नाका अशा आठ ठिकाणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. वीज ग्राहकांनी येथे दाखल होताना सोबत वीज बिल ठेवायचे आहे.

टॅग्स :वीज