१ लाखांच्या लाचखोरीप्रकरणात कस्टम अधीक्षक सीबीआयच्या जाळ्यात, गुन्हा दाखल
By मनोज गडनीस | Published: July 17, 2024 06:56 PM2024-07-17T18:56:25+5:302024-07-17T18:56:56+5:30
Mumbai: एका व्यापाऱ्याने परदेशातून आयात केलेले सामान सोडण्यासाठी त्याच्याकडे एक लाख रुपयांची लाच मागणाऱ्या सीमा शुल्क विभागाच्या अधिक्षकाला सीबीआयने अटक केली आहे. कुमार साकेत असे या अधिक्षकाचे नाव असून तो मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील आंतरराष्ट्रीय कुरियर सेल विभागात कार्यरत होता.
- मनोज गडनीस
मुंबई - एका व्यापाऱ्याने परदेशातून आयात केलेले सामान सोडण्यासाठी त्याच्याकडे एक लाख रुपयांची लाच मागणाऱ्या सीमा शुल्क विभागाच्या अधिक्षकाला सीबीआयने अटक केली आहे. कुमार साकेत असे या अधिक्षकाचे नाव असून तो मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील आंतरराष्ट्रीय कुरियर सेल विभागात कार्यरत होता.
सातारा जिल्ह्यातील एका व्यक्तीने परदेशातून काही सामान आयात केले होते. ते सामान सोडविण्यासाठी जेव्हा संबंधित व्यक्तीने सीमा शुल्क विभागात कार्यरत कुमार साकेत या अधिक्षकाशी संपर्क साधला त्यावेळी त्याने त्याच्याकडे एक लाख रुपयांची मागणी केली. मात्र, तडजोडीनंतर ही रक्कम ८० हजार रुपयांवर निश्चित करण्यात आली. संबंधित व्यक्तीने याची तक्रार मुंबईतील सीबीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. त्यानंतर सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचत कुमार साकेत याला अटक केली आहे.