Join us

Uddhav Thackeray, Aditya Thackeray मोठी बातमी! उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरेंच्या सुरक्षेत कपात

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2023 4:28 PM

उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, तेजस ठाकर यांच्या सुरक्षेत कपात केल्याची माहिती समोर आली.   

मुंबई-  आज मुंबईत एकीकडे आमदार आदित्य ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्या निकटवर्तींयांवर ईडीने छापा टाकला आहे, तर दुसरीकडे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या सुरक्षेत कपात करण्याची आल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या काही दिवसापूर्वी  काही नेत्यांना धमकीचे फोन आल्याचे समोर आले होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह खासदार संजय राऊत यांनाही धमकीचे फोन आले होते. आता गृह विभागाने मातोश्री परिसर आणि उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, तेजस ठाकर यांच्या सुरक्षेत कपात केल्याची माहिती समोर आली.   

...तर फासे उलटे पडू शकतात; आदित्य ठाकरेंच्या निकटवर्तीयावर ईडीची धाड, राऊत संतापले

दोन दिवसापूर्वीच ठाकरे कुटुंबियांतील सुरक्षेत कपात केली असल्याचे बोलले जात आहे. ठाकरे कुटुंबियांच्या सुरक्षेतील एक एक एस्कॉर्ट व्हॅन काढून घेण्यात आली आहेत. मातोश्रीवरीलही बंदोबस्त कमी केला आहे. 

मुंबईत उद्धव ठाकरे यांचे मातोश्री निवासस्थान येथे विशेष सुरक्षा देण्यात आली होती. यातील आता एक एक एस्कॉर्ट व्हॅन कमी करण्यात आल्या आहेत. तर २०१८ मध्ये राज्य गुप्तचर विभागाच्या अहवालानंतर उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्या सुरक्षेत वाढ केली होती. त्यांना झेड प्लस सुरक्षा दिली होती. याअगोदर त्यांना फक्त झेड क्षेणीतील सुरक्षा होती. यात त्यांना बुलेट प्रूफ स्कॉर्पियो कार दिली होती. यात मुंबई पोलिसांतील एक अधिकारी आणि चार कॉन्स्टेबल तैनात केले होते. 

दोन दिवसापूर्वी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे शिबीर झाले. तर काल वर्धापन दिन साजरा केला.  आज राज्यातील पदाधिकाऱ्यांच्या उद्धव ठाकरे बैठका घेत आहेत. राज्यातील पदाधिकाऱ्यांना ठाकरे यांनी सूचना केल्या आहेत. शिवसेनेतील फूट अजुनही थांबलेली नाही. आमदार मनिषा कायंदे यांनीही ठाकरे गटाला जय महाराष्ट्र केला आहे. 

टॅग्स :उद्धव ठाकरेशिवसेनाआदित्य ठाकरेपोलिस