Join us

नामंकित महाविद्यालयांचा कट ऑफ पुन्हा वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2021 4:15 AM

दुसऱ्या विशेष फेरी : पसंतीच्या महाविद्यालयाची वाट पाहणाऱ्या विद्यार्थ्यांची कोंडीलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या दुसऱ्या ...

दुसऱ्या विशेष फेरी : पसंतीच्या महाविद्यालयाची वाट पाहणाऱ्या विद्यार्थ्यांची कोंडी

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या दुसऱ्या विशेष फेरीमध्ये २१,८३५ विद्यार्थ्यांना अलॉटमेंट मिळाली आहे. विशेष म्हणजे पहिल्या विशेष फेरीनंतर ही विद्यार्थ्यांचा नामंकित महाविद्यालयांकडे ओढा असल्यामुळे या फेरीत नामांकित महाविद्यालयांचा मागील फेरीत कमी झालेला कट ऑफ पुन्हा वाढला. केसी, जयहिंद, एचआर पोदार, रुपारेलसारख्या नामांकित महाविद्यालयांतील कट ऑफ १ ते १० टक्क्यांच्या टप्प्यात वाढल्याचे दिसून आले. त्यामुळे मागच्या फेरीत कमी झालेले कट ऑफ पुन्हा नव्वदीपर गेल्याने अजूनही प्रवेश न घेतलेल्या विद्यार्थ्यांची चांगलीच कोंडी झाली आहे.

दुसऱ्या विशेष फेरीसाठी मुंबई विभागात १ लाख ७ हजार ३१२ जागा उपलब्ध होत्या. त्यासाठी ३२,३६८ विद्यार्थ्यांनी अर्ज केले. यामध्ये १० हजार विद्यर्थ्यांना त्यांच्या पहिल्या पसंतीचे, तर ३,७२४ विद्यार्थ्यांना दुसऱ्या पसंतीचे महाविद्यालय मिळाले आहे. यामध्ये कला शाखेच्या १,७५१, वाणिज्य १४,८५४ तर विज्ञान शाखेच्या ४,९३३ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला आहे. एचसीव्हीसी शाखेमध्ये प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या २८७ आहे.

केसी महाविद्यालयाच्या तिन्ही शाखांच्या कट ऑफमध्ये कमालीची वाढ दिसून आली आहे, तर एनएम, एचआर, जयहिंद, पोदार, मिठीबाई महाविद्यालयांचे वाणिज्य शाखेचे कट ऑफ नव्वदीपार असल्याचे दिसून आले आहे. पुढील फेरी विशेष करून एटीकेटी विद्यार्थ्यांसाठी आहे. पण त्यात इतर विद्यार्थ्यांना ही संधी मिळणार असली तरी पसंतीच्या महाविद्यालयात जागा उपलब्ध होणे विद्यार्थ्यांसाठी कठीण होणार आहे. दुसऱ्या विशेष फेरीमध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांना ८ जानेवारीपर्यंत प्रवेश घेण्यासाठी मुदत मिळणार असून त्यानंतर पुढील प्रवेशाची प्रक्रिया जाहीर केली जाणार असल्याचे शिक्षण संचालनालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

महाविद्यालये लवकर सुरू करण्याची मागणी

अनेक नामांकित महाविद्यालयातील विविध शाखांच्या जागांची क्षमता पूर्ण झाल्याने प्राध्यापक, प्राचार्य, पालकांकडून वर्ग प्रत्यक्षात सुरू करण्याची मागणी होत आहे. अकरावीचा अभ्यासक्रम हा बारावीच्या अभ्यासक्रमाचा पाया असल्याने तो व्यवस्थित व वेळेत पूर्ण होणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे. मात्र पुढील ३ ते ४ महिन्यांत तो अभ्यासक्रम पूर्ण कसा करायचा हा प्रश्न महाविद्यालयांसमोर उभा राहिला आहे.

..............

दुसऱ्या विशेष फेरीत अलॉटमेंट मिळालेले विद्यार्थी

कला- १७५१

वाणिज्य - १४,८६४

विज्ञान - ४९३३

एचसीव्हीसी - २८७

एकूण - २१,८३५

,......

पसंतीक्रम - कला - वाणिज्य - विज्ञान - एचसीव्हीसी - एकूण

पहिला - १२३९- ६१७३- २३७३- २७३-१०,०५८

दुसरा- २४७- २५२८- ९३८- ११- ३७२४

तिसरा- १२०- १७५८- ५८९- ३- २४७०

...... ......

महाविद्यालय - कला वाणिज्य - विज्ञान (कट ऑफ टक्क्यांमध्ये )

एचआर - ..... - ९१. २ - ......

केसी - ८७.४ - ९१ - ८१ . ६

जयहिंद - ८९ . - ९० . ८- ८३. ४

रुईया - .... - ..... - ......

पोदार - ..... - ९३. २ - .....

रुपारेल - .... - ..... - ९१. ४

साठ्ये- ८७. ८ - ..... - ८३ ...

डहाणूकर - .... - ८८. ४ -....

भवन्स- ७८ - ८७. ६ - ८४ . ८

मिठीबाई - ... - ९० ... - ८० ...

एनएम- .... - ९३. ४ - .....

वझे केळकर - ८७ - ... - ९२ ...

सेंट झेविअर्स- .... - .... - ८६. ४