Join us

१०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिका सेवेतही आता ‘कट प्रॅक्टिस’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2017 5:29 AM

कट प्रॅक्टिसविरोधी कायद्याचा कच्चा मसुदा तयार असून, तो सर्वसमावेशक होण्यासाठी विविध स्तरांतून येणा-या सूचना, हरकतींचा सध्या विचार केला जात आहे. यासंदर्भातील विविध प्रतिनिधींच्या झालेल्या बैठकीत राज्य शासनाच्या १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेच्या सेवेतही

स्नेहा मोरेमुंबई : कट प्रॅक्टिसविरोधी कायद्याचा कच्चा मसुदा तयार असून, तो सर्वसमावेशक होण्यासाठी विविध स्तरांतून येणा-या सूचना, हरकतींचा सध्या विचार केला जात आहे. यासंदर्भातील विविध प्रतिनिधींच्या झालेल्या बैठकीत राज्य शासनाच्या १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेच्या सेवेतही सर्रास ‘कट प्रॅक्टिस’ केली जाते ही धक्कादायक बाब डॉक्टरांनी मांडली. रुग्णवाहिकेचे चालक आणि कर्मचारी यांच्यामार्फत ही नफेखोरी राजरोसपणे सुरू असल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे लवकरच रुग्णवाहिकेसाठी काम करणारे चालक आणि कर्मचारी वर्ग यांनासुद्धा कायद्यांतर्गत समाविष्ट करून घेण्यात येणार आहे.कट प्रॅक्टिसविरोधी कायद्याचा मसुदा तयार झाल्यानंतर त्वरित कायदा निर्मितीसाठी हालचाली सुरूझाल्या. मात्र विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांमुळे अजूनही अंतिम मसुदा प्रतीक्षेत आहे. याविषयी बैठकींचे सत्र सुरू असून, त्यात वेगवेगळ्या सूचना, हरकतींचा अक्षरश: पाऊस पडत आहे. त्यातच राज्य शासनाच्या १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेच्या सेवेत मोठ्या प्रमाणात कट प्रॅक्टिस केली जाते, असा सूर डॉक्टरांनी बैठकीत आळविला.याचाच अर्थ रुग्णवाहिकेचे कर्मचारी आणि चालक आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना मदत करताना ठरावीक रुग्णालयात घेऊन जातात; आणि त्या रुग्णालयाकडून वा एखाद्या डॉक्टरकडून त्याचे कमिशन घेण्यात येते.या आपत्कालीन परिस्थितीत बºयाचदा रुग्ण आणि रुग्णाचे नातेवाईक चिंताग्रस्त आणि तणावात असल्याने त्यांना हा ‘कमिशन’चा घोळ लक्षात येत नाही. त्यामुळे याचाच फायदा घेऊन दिवसागणिक या रुग्णवाहिकेच्या सेवेतील कमिशनचे देवाण-घेवाण करण्याचे प्रकार फोफावत असल्याचे दिसूनयेत आहे.कट प्रॅक्टिस म्हणजे काय?एखाद्या रुग्णाला एका डॉक्टरकडूनदुसºया डॉक्टरकडे पाठवून त्या बदल्यात कमिशन घेणे याला कट प्रॅक्टिस म्हटले जाते. मेडिकल कौन्सिल आॅफ इंडियाच्या नियमांनुसार अशा प्रकारे रुग्णाला आर्थिकरीत्या लुबाडणे चुकीचेअसल्याचे म्हटले गेले आहे.