कट प्रॅक्टीस मसुद्यावर होणार शिक्कामोर्तब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2017 05:58 AM2017-08-18T05:58:53+5:302017-08-18T05:58:56+5:30

कट प्रॅक्टीसविरोधी कायद्याचा मसुदा तयार झाला असून हरकती आणि सूचनांसाठी खुला करण्यात आला आहे.

The cut practice will be on the draft | कट प्रॅक्टीस मसुद्यावर होणार शिक्कामोर्तब

कट प्रॅक्टीस मसुद्यावर होणार शिक्कामोर्तब

Next


स्नेहा मोरे।
मुंबई : कट प्रॅक्टीसविरोधी कायद्याचा मसुदा तयार झाला असून हरकती आणि सूचनांसाठी खुला करण्यात आला आहे. हा मसुदा आता अंतिम टप्प्यात असून २३ आॅगस्ट रोजी होणा-या बैठकीत त्यावर शिक्कामोर्तब करण्यात येणार असल्याची माहिती समितीतील सदस्य डॉ. हिंमतराव बाविसकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. त्याचप्रमाणे, लाचलुचपत प्रतिंबधक विभागाच्या अंतर्गत येणारा हा कायदा येत्या हिवाळी अधिवेशनात मंजूर होणार आहे.
मुंबईच्या ‘एशियन हार्ट इन्स्टिट्युटचे डॉ. रमाकांत पांडा यांनी रस्त्यावर ‘आॅनेस्ट ओपिनियन’, ‘नो कमिशन टू डॉक्टर्स’ असे बॅनर लावल्यानंतर वैद्यकीय वतुर्ळात कट प्रॅक्टीसविषयी चर्चेला उधाण आले होते. त्या पार्श्वभूमीवर शासकीय यंत्रणांनीही याची त्वरित दखल घेत कटप्रॅक्टीसविरोधी कायद्याच्या हालचालींसाठी वेगाने तयारी केली. यासाठी वैद्यकीय शिक्षण व औषधद्रव्ये संचालनालयांतंर्गत समिती स्थापन करुन मसुद्याची प्रतही तयार केली.
अण्णासाहेब करोले यांना पॅथालॉजिस्ट संघटनेचा विरोध, राज्यपालांसह प्रवीण दीक्षित यांना लेखी निवेदन
सांगली येथील बेकायदेशीर पॅथालॉजी लॅब चालविणारे अण्णासाहेब करोले यांना २३ आॅगस्ट रोजी कटप्रॅक्टीसविरोधी कायदाविषयक होणाºया बैठकीत निमंत्रित सदस्य म्हणून बोलविण्यात आले आहे. मात्र अशा बेकायदेशीर व्यक्तींना बढावा देऊन समाजाची दिशाभूल करणे चुकीचे असल्याचे
या लेखी निवेदनात म्हटले असल्याचे मत महाराष्ट्र असोसिएशन आॅफ प्रॅक्टीसिंग अँण्ड मायक्रोबायोलॉजिस्ट संघटनेचे अध्यक्ष डॉ. संदीप
यादव यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. या निवेदनाची प्रत
वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष
महाजन यांनाही देण्यात आली
आहे.
>डॉ. रमाकांत पांडा यांचा ‘कमबॅक’
कट प्रॅक्टीसविरोधी समितीत फेरबदल करुन डॉ. रमाकांत पांडा यांना वगळण्यात आले होते. मात्र त्यानंतर या मसुद्याविषयी अंतिम निर्णय घेण्यासाठी २३ आॅगस्ट २०१७ रोजी होणाºया बैठकीत सदस्य सचिवाच्या भूमिकेत असणाºया वैद्यकीय शिक्षण संचालनालयाने पुन्हा एकदा निमंत्रित सदस्य म्हणून बोलावणे धाडले आहे. त्यामुळे पुन्हा वैद्यकीय क्षेत्रात चर्चांना उधाण आले आहे.

Web Title: The cut practice will be on the draft

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.