तिसऱ्या यादीतील कटऑफ गुणांत अद्याप घसरण नाहीच

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2020 02:19 AM2020-12-16T02:19:44+5:302020-12-16T02:20:01+5:30

नामांकित महाविद्यालयांत प्रवेश फुल्ल

The cutoff points in the third list have not dropped yet | तिसऱ्या यादीतील कटऑफ गुणांत अद्याप घसरण नाहीच

तिसऱ्या यादीतील कटऑफ गुणांत अद्याप घसरण नाहीच

Next

मुंबई : अकरावी प्रवेशाच्या नियमित अंतिम गुणवत्ता यादी महाविद्यालयांकडून प्रसिद्ध करण्यात आली असून अनेक नामांकित महाविद्यालयांच्या जागा फुल्ल झाल्या आहेत. त्यामुळे तेथील प्रवेश बंद करण्यात आले असून ज्या महाविद्यलयात जागा उपलब्ध आहेत तेथील कट ऑफ गुणांमध्येही वाढ झाल्याने ७० ते ८५ टक्क्यांमधील विद्यार्थ्यांची निराशा झाली.

पहिल्या गुणवत्ता यादीत एचआर महाविद्यालयाचे कटऑफ गुण ९३.८% असताना तिसऱ्या गुणवत्ता यादीत त्यात वाढ होऊन ते ९४.२% इतके झाले. केसी महाविद्यालयाच्या कला शाखेच्या कटऑफमध्येही दुसऱ्या गुणवत्ता यादीपेक्षा १.२% वाढ झालेली दिसून आली.

वाणिज्य शाखेच्या कट ऑफमध्ये घसरण झाल्याचे दिसून आलेले नाही. रुईया महाविद्यालयाच्या कला व विज्ञान शाखेच्या कटऑफमध्येही घसरण न झाल्याने अनेक विद्यार्थ्यांच्या त्या महाविद्यलयातील प्रवेशाची संधी हुकल्याची प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी दिली. पोदार महाविद्यालयातील जागा फुल्ल झाल्याने पुढील फेरीसाठी जागाच उपलब्ध नाहीत.

कमी गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांमध्ये निराशा
यंदा नामांकित महाविद्यालयांतील गुणांचा कटऑफ खाली न आल्यानेत्यापेक्षा कमी गुण असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पदरी आपल्या आवडत्या महाविद्यालयात प्रवेश न मिळाल्याने निराशा पडली. दहावीचा निकाल यंदा चांगला लागल्याने आधीच अकरावी प्रवेशासाठी खुल्या गटात मोठी स्पर्धा होती. त्यातच मराठा संवर्गाच्या जागा त्यात समाविष्ट केल्याने स्पर्धा वाढली व नामांकित महाविद्यालयांच्या कट ऑफमध्ये विशेष घसरण झाली नाही.

तिसऱ्या गुणवत्ता यादीनंतर महाविद्यालयाचे कट ऑफ गुण 
(गुण टक्क्यांमध्ये)
महाविद्यालय    कला    वाणिज्य    विज्ञान
एचआर    ...    ९४.२    ...
केसी    ९०.२    ९२.२    ८९.२
जयहिंद    ९२.४    ९२.६    ८८.८
रुईया    ९४.०    ...    ९४.२
पोदार-     ...    ...    ...
रुपारेल    ९०.२    ९२.०    ९१.४
साठे    ८४.६    ९०.२    ९०.०
डहाणूकर    ...    ७६.१६    ...

Web Title: The cutoff points in the third list have not dropped yet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.