रस्त्यावर तलवारीने केक कापणे पडले महागात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:06 AM2021-09-22T04:06:28+5:302021-09-22T04:06:28+5:30

मुंबई : रस्त्यावर तलवारीने केक कापून त्याचे व्हिडीओ व्हायरल करण्याची फॅशन पाहावयास मिळत आहे, तर काही ठिकाणी हातात तलवारी ...

Cutting cakes with a sword on the street was expensive | रस्त्यावर तलवारीने केक कापणे पडले महागात

रस्त्यावर तलवारीने केक कापणे पडले महागात

Next

मुंबई : रस्त्यावर तलवारीने केक कापून त्याचे व्हिडीओ व्हायरल करण्याची फॅशन पाहावयास मिळत आहे, तर काही ठिकाणी हातात तलवारी घेऊन परिसरात दहशत पसरविण्याचाही प्रयत्न करतात. मात्र, त्यांच्या याच फॅशनमुळे त्यांना कोठडीची हवा खावी लागत आहे. वाढदिवसानिमित्त तलवारीने केक कापणाऱ्या तुषार थोरात (३०), तसेच त्याच्या मित्राविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नायगाव परिसरात तुषारच्या वाढदिवसानिमित्त मित्राने आणलेला केक तलवारीने कापला. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. पुढे ही बाब पोलिसांच्या निदर्शनास येताच, हत्यार बंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला.

अशाच प्रकारे काही जण हातात तलवारी घेऊन परिसरात दहशत पसरविण्याचाही प्रयत्न करतात. मात्र, मुंबई पोलिसांच्या याबाबतचे व्हिडीओ अथवा माहिती हाती लागताच, त्यांच्यावर तत्काळ कारवाई करण्यात येत आहे.

कट्टा, तलवार अन् चाकू... आणि धिंगाणा...

तलवारीबरोबर काही ठिकाणी हातात कट्टा, चाकू घेऊन सोशल मीडियावर व्हायरल करून, दादागिरीचे प्रकारही पाहावयास मिळतात, तर काही ठिकाणी डीजे वाजवून गोंधळ घालण्याचाही प्रयत्न करतात. मात्र, मुंबई पोलिसांकडून अशी घटना समोर येताच, तत्काळ कारवाई करण्यात येते. त्यामुळे मुंबईत अशा घटनांचे प्रमाण कमी आहे.

मुंबई पोलिसांचा वॉच

सोशल मीडियावरील सर्व हालचालीवर पोलिसांचे विशेष लक्ष असते, तर दुसरीकडे अशाच गुंडागर्दीच्या व्हिडीओला प्रोत्साहन देणाऱ्याच्या विरुद्धही कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

Web Title: Cutting cakes with a sword on the street was expensive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.