मध्य प्रदेशातील मुलीला विकण्याचा कट उधळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2017 07:12 AM2017-10-19T07:12:01+5:302017-10-19T07:12:11+5:30
मध्य प्रदेशातून एका १५ वर्षांच्या मुलीला पळवून आणून तिला विकण्याचा कट मुंबई पोलिसांनी हाणून पाडला. समाजसेवा शाखेने मुक्तता करत मंगळवारी तिला सुखरूपपणे तिच्या पालकांच्या स्वाधीन केले.
मुंबई : मध्य प्रदेशातून एका १५ वर्षांच्या मुलीला पळवून आणून तिला विकण्याचा कट मुंबई पोलिसांनी हाणून पाडला. समाजसेवा शाखेने मुक्तता करत मंगळवारी तिला सुखरूपपणे तिच्या पालकांच्या स्वाधीन केले.
सुमन (नावात बदल) ही मुलगी मध्य प्रदेशच्या भोपाळमध्ये राहणारी आहे. तिच्या शेजारी राहणाºया एका मुलासोबत तिचे प्रेमसंबंध होते. लग्नाचे आमिष दाखवत त्याने तिला २७ सप्टेंबर रोजी मुंबईत पळवून आणले. या प्रकरणी भोपाळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. याबाबत समाजसेवा शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र गिद्दे यांना माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी या प्रकरणी चौकशी सुरू केली. तेव्हा सुमनसोबत असलेल्या तिच्या प्रियकराने तिला विकण्याचा डाव रचल्याचे गिद्दे यांना समजले. या मुलीला आरसीएफ पोलिसांच्या हद्दीत असलेल्या म्हाडा कॉलनीतील बिल्डिंग क्रमांक ८ मध्ये लपविण्यात आले
होते.
गिद्दे यांचे पथक सुमनचा मागोवा घेत त्या ठिकाणी पोहोचले आणि त्यांनी सुमनची सुखरूप सुटका केली. तसेच भोपाळ पोलिसांना संपर्क साधत सुमनला तिच्या पालकांच्या हाती सोपवले. मात्र तिला पळवून आणणारा मुलगा अद्याप फरार असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.