Join us

लॉकडाऊनच्या काळात सायबरचे २१८ गुन्हे दाखल; ४५ आरोपींना अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2020 7:11 PM

कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर असलेल्या लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये, काही गुन्हेगार व समाजकंटक या परिस्थितीचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत.

 मुंबई - कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर असलेल्या लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये, काही गुन्हेगार व समाजकंटक या परिस्थितीचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्याविरुद्ध आतापर्यंत एकूण 218 गुन्हे दाखल केलेआहेत. यापैकी 45 जणांना अटक करण्यात आली आहे.अशी माहिती महाराष्ट्र सायबर विभागाने दिली. टिकटॉक ,फेसबुक ,ट्विटरवर  चालणाऱ्या गैरप्रकारांसंदर्भात राज्यातील विविध पोलीस स्टेशन मध्ये  ज्या २१८ गुन्ह्यांची  नोंद झाली आहे त्यापैकी ८ गुन्हे अदखलपात्र आहेत. त्यामध्ये बीड २६, कोल्हापूर १५, पुणे ग्रामीण १५, जळगाव १३, मुंबई १२, सांगली १०,जालना ९, नाशिक ग्रामीण ९, सातारा ८, नांदेड ७, परभणी ७, नाशिक शहर ७, ठाणे शहर ६, नागपूर शहर ५, सिंधुदुर्ग ५ ,नवी मुंबई ५,सोलापूर ग्रामीण ५, बुलढाणा ४, पुणे शहर ४, लातूर ४, गोंदिया ४, सोलापूर शहर ३, रायगड २, उस्मानाबाद २, ठाणे ग्रामीण १,धुळे १यांचा प्रामुख्याने समावेश आहे .

यात आक्षेपार्ह व्हाट्सअँप मेसेजेस फॉरवर्ड केल्या प्रकरणी १०२ गुन्हे, आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट्स शेअर केल्या प्रकरणी ७१ गुन्हे,विडिओ शेअर प्रकरणी २ गुन्हे व ट्विटर द्वारे आक्षेपार्ह ट्विट केल्या प्रकरणी ३ गुन्हे दाखल झाले आहेत . तर अन्य सोशल मीडियाचा  गैरवापर केल्या प्रकरणी ३८ गुन्हे दाखल झाले आहेत.नाशिक ग्रामीण अंतर्गत सटाणा पोलीस स्टेशनमध्ये एका गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. एका समाजकटकाने एका लिंकवरील खोट्या बातमीद्वारे  कोरोनाच्या भीतीमुळे मालेगावमधील लोकांचे लोंढे सटाण्यात येणार"* अश्या मजकुराची बातमी व्हाट्सअँप व अन्य समाज  माध्यमांवर पसरवून शांतता बिघडविण्याचा प्रयत्न केला.ठाणे शहर व भिवंडी मध्येही अन्य एका गुन्ह्यांची नोंद करण्यात आली . सदर आरोपीने व्हाट्सअँप व  समाजमाध्यमांचा वापर करून कोरोना महामारी बद्दल चुकीची माहिती पसरवून त्याद्वारे कोरोना महामारीचा प्रसार रोखणासाठी सुरु असलेल्या कामात अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. केंद्र सरकार व राज्य सरकार वेळोवेळी ज्या नियमावली प्रसारित करत असतात त्याचे पालन करावे व कृपया घरीच थांबावे व कारण नसल्यास घराच्या बाहेर पडू नये.असे आवाहन महाराष्ट्र सायबर विभागामार्फत करण्यात येत आहे. 

टॅग्स :गुन्हेगारीकोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरस