मुंबई : स्टॅण्ड अप कॉमेडियन राजू निगम याचे फेसबुक खाते हॅक करण्यात आल्याप्रकरणी त्यांनी गुरुवारी ओशिवरा पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. या प्रकरणी सायबर सेलची मदत घेतली जाणार असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
निगमने लेखी तक्रार दिली असली तरी हे प्रकरण सायबर गुन्ह्याशी संबंधित आहे. त्यानुसार याबाबत संबंधित अधिकाऱ्यांची मदत घेतली जात असल्याचे तपास अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. निगम याने दिलेल्या तक्रारीनुसार २६ फेब्रुवारी, २०२१ त्याचे फेसबुक खाते हॅक करण्यात आले. त्याचा वापर करून अनेक परिचितांना आक्षेपार्ह मेसेज पाठविले गेले. निगम याचा जवळपास २ लाखांचा फॅन फॉलोअर आहे. याबाबत त्याने फेसबुकलादेखील ईमेलमार्फत कळविले आहे. याआधी त्याचे इन्स्टाग्राम अकाउंटदेखील हॅक करण्यात आले होता. त्यानुसार सायबर सेल याबाबत चौकशी करीत असून अद्याप यात एफआयआर दाखल करण्यात आलेली नाही.