लॉकडाऊनबद्दल अफवा पसरविणाऱ्यावर सायबर पोलिसांची करडी नजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:06 AM2021-02-24T04:06:32+5:302021-02-24T04:06:32+5:30
गुन्हे दाखल होणार लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असले तरी अद्याप कोठेही पूर्णपणे टाळेबंदी (लॉकडाऊन) ...
गुन्हे दाखल होणार
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असले तरी अद्याप कोठेही पूर्णपणे टाळेबंदी (लॉकडाऊन) करण्यात आलेली नाही. यासंदर्भात सोशल मीडियावर अफवा पसरविणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. समाजमाध्यमातून त्याबाबत चुकीचे मेसेज पाठविणाऱ्यांवर सायबर गुन्हे शाखेकडून करडी नजर ठेवण्यात येत आहे.
मुंबईसह राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णांमध्ये पुन्हा झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे राज्य सरकारने त्याला रोखण्यासाठी फिजिकल डिस्टन्सिंग पाळणे, मास्क वापरण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, सोमवारपासून विविध अफवा व्हाॅट्सॲप, फेसबुक आणि अन्य समाज माध्यमांवरून पसरविल्या जात आहेत. राज्यात लॉकडाऊन जाहीर झाले आहे, एक मार्चपासून लॉकडाऊनची अंमलबजावणी केली जाईल, असे मेसेज पसरवले जात असल्याने गृहमंत्री अनिल देशमुख यांनी त्याची दखल घेतली आहे, खोटी माहिती प्रसारित करणाऱ्यांवर कारवाईचे आदेश सायबर पोलिसांना दिले असून, अफवा पसरविण्याचा प्रयत्न करणाऱ्यावरही कारवाई करण्याची सूचना दिल्याने सायबर गुन्हे शाखेकडून त्याबाबत कार्यवाही करण्यात येत आहे.
.................