सायबर ठग जोरात...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 04:07 AM2020-12-22T04:07:00+5:302020-12-22T04:07:00+5:30

सायबर ठग जोरात... ऑनलाइन भामट्यांनी कोरोनामुळे नागरिकांमध्ये निर्माण झालेले कुतूहल किंवा दहशतीचा फायदा घेत फसवणुकीसाठी नवी कार्यपद्धती सुरू केली ...

Cyber thugs loud ... | सायबर ठग जोरात...

सायबर ठग जोरात...

Next

सायबर ठग जोरात...

ऑनलाइन भामट्यांनी कोरोनामुळे नागरिकांमध्ये निर्माण झालेले कुतूहल किंवा दहशतीचा फायदा घेत फसवणुकीसाठी नवी कार्यपद्धती सुरू केली आहे. कोरोनाबाबत माहिती किंवा सूचना देण्याच्या निमित्ताने फसवा ई-मेल धाडून पासवर्ड किंवा अन्य तपशील चोरण्याचे प्रकार वाढले आहेत. दुसरीकडे कोरोनासंबंधित व्हॅक्सिनबाबत फसवणूक करण्यासाठी सायबर ठगांकड़ून प्रयत्न सुरू झाले आहेत. मुंबईत कोरोनाच्या काळात अफवांचे पीक वाढले. नोव्हेबरपर्यंत राज्यभरात ६९० हून अधिक अफवा पसरविल्याप्रकरणी गुन्हे नोंद आहेत. मुंबईत नोव्हेबर अखेरपर्यंत क्रेडिट कार्ड तसेच फसवणुकीचे ५१५ गुन्हे पोलीस दफ्तरी नोंद झाले आहेत. यापैकी अवघ्या १५ गुह्यांची उकल झाली आहे. गेल्या वर्षी हाच आकडा ७७५ होता. त्यापैकी ४० गुह्यांची उकल झाली आहे.

राज्यात सायबर गुन्हे

वर्ष - गुन्हे

२०१८ - ३५११

२०१९ - ४६२२

२०२० (मेपर्यंत) - १५१८

(२०२० मधील वर्षभराच्या आकड्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तत्काळ अवगत करू.)

....

मुंबईत दाखल ऑनलाइन गुन्हे

वर्ष फसवणूक गुन्हे उकल

२०१९ ७७५ ४०

२०२० ५१५ १५

Web Title: Cyber thugs loud ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.